Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.१४:- पुणे शहरातील बाणेर परीसरातील हायप्रोफाइल भागात पुणे म.ना.पा.च्या सहकार्याने बिल्डर पुढं चक्क घातलं लोटांगण
पुणे दिनांक १२ जानेवारी.पुणे तिथे काय उणे पुण्यात बाणेर सारख्या हाय प्रोफाईल भागात व्हाईट हाऊस हाॅटेलच्या भागात पुणे महापालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. दरम्यान अतिक्रमण कारवाई होताच बिल्डरने तातडीने जागेवर पत्रे लावून ताबा घेतला आहे.दरम्यान आता या भागातील नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे.”सदरची कारवाई ही बिल्डरच्या भल्या साठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली का.?व या जागी असणारे अतिक्रमण काढण्यासाठी बिल्डरने बाउंसर सह गुन्हे गारांचा यांचा देखील वापर करण्यात आला आहे.
दरम्यान या जागेवरील अतिक्रमण काढण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने येथील अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना चक्क अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.त्यामुळे संबंधित बिल्डर व महानगरपालिका अधिकारी यांच्यात “आर्थिक व्यवहार” झाल्याची देखील यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केल्या आहेत.व कारवाई बाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान सदरची कारवाई ही एका मोठ्या बिल्डर यांच्या सांगण्यावरून व सहकार्यामुळे झाली आहे.असे देखील स्थानिक नागरिक यांचा गंभीर आरोप यावेळी केला आहे.तसेच जर महानगरपालिकेच्या वतीने ही अतिक्रमण कारवाई होत असताना हे सर्व शासकीय कामाचा भाग असतांना या कारवाईत खासगी शेकडो बाउंसर यांचा या ठिकाणी उपस्थिती कशा साठी? असा एक गंभीर प्रश्न या महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान कशा साठी.ही एक गंभीर बाब आहे.या बाबत स्थानिक नागरिक व अतिक्रमण धारक यांना देखील हा प्रश्न पडला आहे.या वरुन पुणे महानगरपालिका व बिल्डर यांच्यात काही साटेलोटे आहे का? हा एक प्रश्न पडला आहे.दरम्यान सदरची अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर संबंधित बिल्डरने त्या जागेवर बाउंसर यांच्या मदतीने त्या जागेवर त्वरित पत्रा मारुन ती जागा आपल्या ताब्यात घेतली आहे.यावरुन स्पष्ट होते की.ही अतिक्रमण कारवाई ही बिल्डरच्या आर्थिक हितसंबंधा मुळेच झाली आहे हे यावरून स्पष्ट होत आहे.नेमके पुणे महानगरपालिकेच्या कोण कोणत्या अधिकांऱ्याचे ✋ हात नेमके ओले झालेत.?हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान बाणेर हा भाग हायप्रोफाइल असून येथील जागेला सोन्याचा बाजार भाव आहे.यात पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांनी देखील आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.दरम्यान काहीही असू येथे दबंग गिरी करूनच ही कारवाई करुन ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट पुणे महापालिकेच्या व महसूल यंत्रणेने घातला आहे.हे एकंदरीत स्पष्ट होत आहे.हा झालेला प्रकार हा मात्र पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेर घरात घरांसाठी होत आहे.हे पुण्यात मात्र शोभानिय नक्कीच नाही.काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा भागात पुण्यातील कुख्यात डॉन शरद मोहोळचा भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.सदरचा खून देखील पुण्यात जमिनीला असणारा सोन्याच्या बाजारभाव यामुळेच झाला आहे.असे तपासात आता पुढे येत आहे.हे देखील येथे नमूद करावा लागत आहे.पण म्हणतात ना पुणे तिथे काय उणे.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!