Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बनावट विदेशी स्कॉच दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पुण्यात छापा

7

पुणे,दि.१४ : -पुणे कात्रज देहू रोड बायपास, स.नं.३, आंबेगाव परिसरातीलराज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट विदेशी स्कॉच तयार करणाऱ्या कारखान्याचा छापा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. देहू रोड बायपास, आंबेगाव बु. येथे बनावट विदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना सुरु होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे पुण्यातील काही स्कॉच पिणाऱ्या नागरिकांन मध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत महेशभाई हरिभाई कोळी (रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२) रात्री करण्यात आली.
आंबेगाव बुद्रुक येथे बनावट विदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना सुरु असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क, सी विभागाचे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी आंबेगाव बु. येथील कारखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणावरुन बनावट विदेशी स्कॉचच्या ३४ सिलबंद बाटल्या, दोन दुचाकी वाहने, ५५१ रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बुच, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लास्टिक पॅकिंग रोल, प्लास्टिक चिकटपट्टी आणि मोबाइल फोन असा एकूण १० लाख ३९ हजार ७४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

या कारखान्यात विदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यात पुन्हा मद्य भरून त्याची विक्री केली जात होती. हे मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरामध्ये पाठवले जात होते तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती. अशी माहिती आरोपी महेशभाई कोळी याने पथकाला दिली.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन. एन. मारकड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. लोहकरे, एस. एस. इंदलकर, जवान व वाहनचालक जवान शरद भोर, गोपाल कानडे व महिला जवान उज्वला भाबड यांच्या पथकाने केली. दाखल गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क, सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभु शेवाळे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.