Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे निवडणूक मतदान प्रात्यक्षिक संपन्न

9

Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे निवडणूक साक्षरता जागृती मोहीमे अंतर्गत विद्यार्थ्यांच्या माहीतीकरीता निवडणुक मतदान प्रात्यक्षिक, मराठी भाषा भवन मुंबई विद्यापीठ येथे दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिक कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिवस व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती या निमित्ताने युवा वर्गास प्रोत्साहन देताना प्राध्यापक बळीराम गायकवाड यांनी भारतीय लोकशाही बाबत माहिती देताना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा व त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन बाबतचा संभ्रम दूर होण्याकरता त्यांनी प्रत्यक्ष या प्रक्रियेत सामील व्होऊन शंका निरसन करून घ्यावे असे आवाहन केले आहे. मुंबई विद्यापीठ यापुढेही युवा वर्गास सतत प्रेरणादायी ठरेल असं कार्य करत राहील याचे आश्वासन दिले व या कार्यक्रमास एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सामील झाला याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्कूल कनेक्ट अभियासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; १६ जानेवारी ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान विविध महाविद्यालयात संपर्क अभियान
शासनाच्या वतीने राज्य निवडणूक आयोग कलिना निवडणूक विभागाचे प्रतिनिधी श्री संतोष साहू आणि बाबुराव कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची सुलभता व पारदर्शकता याबाबत माहिती दिली. या प्रात्यक्षिक मतदान प्रक्रियेमध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान केले व स्वतः केलेल्या मताची त्यांनी पडताळणी देखील केली. त्यामुळे त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला.

मुंबई विद्यापीठात दरवर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत असतात. यापैकी हजारो विद्यार्थी हे नव्याने प्रत्यक्ष मतदार होत असतात. या नवीन मतदारांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी व ईव्हीएम मशीन बाबतचा संभ्रम दूर व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षर करण्यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत विविध उपक्रम राबवले जातात.

यूजीसी ने नुकतीच विद्यापीठांना अशा प्रात्यक्षिक उपक्रमांची आखणी करण्याची जबाबदारी दिलेली आहे. तसेच विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षर करण्याचं आवाहन केलं आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बाबतची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने प्रात्यक्षिक देण्याचे आवाहन युजीसीने केले आहे. त्याकरिता मुंबई विद्यापीठाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या प्रात्यक्षिक प्रक्रियेसाठी लागणारी सर्व मतदार यंत्रे व उपकरणे राज्य निवडणूक आयोग कलिना निवडणूक विभाग यांच्या वतीने उपलब्ध करण्यात आली होती आणि त्यांच्या सर्व प्रतिनिधींनी या कार्यक्रमाची उत्स्फूर्तपणे जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांसाठी हे प्रात्यक्षिक सादर केले व अधिक माहितीसाठी ध्वनी चित्रफीतही दाखवण्यात आली.

या मोहिमेची सुरूवात व उद्घाटन गेल्या महिन्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले होते. त्याप्रसंगी या संपूर्ण प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती देताना जास्तीस विद्यार्थ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन कुलगुरूंनी केले होते. या आवाहनाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांचे निवडणूक अधिकार व जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करण्यात आले. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात मतदान यंत्रे व निवडणूक प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांकडून ह्या प्रशिक्षणाची व प्रात्यक्षिकांची मागणी होत आहे. याच मोहिमेचा पुढील भाग म्हणून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.

या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना निवडणूक प्रक्रिये बाबत व निवडणूक यंत्रे उपकरणे आणि प्रत्यक्ष मतदान याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

निवडणूक साक्षरता ही आज काळाची गरज बनली आहे. भारताच्या इतर भागांप्रमाणेच मुंबईतही नागरिकांमध्ये निवडणूक साक्षरता वाढवण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले शिक्षक व विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या परिसरात प्रत्यक्ष जाऊन पथनाट्य, प्रदर्शन, भित्तीचित्र, प्रबोधन गीते, वक्तृत्व, पोवाडा, सर्वेक्षण, वक्तृत्व, परिसंवाद आणि परिषदा अशा विविध उपक्रमांद्वारे जनतेमध्ये निवडणूक साक्षरता वाढीस लागण्यास हातभार लावणार आहेत. हे प्रशिक्षित प्रतिनिधी मतदार शिक्षण कार्यक्रम राबवून नागरिकांना मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया आणि त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास प्रेरित करणार आहेत. व्यापक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरचित्रवाणी, रेडिओ, प्रिंट आणि सोशल मीडियासह विविध माध्यमांच्या माध्यमातून जागृती मोहिमा चालवणार आहेत व निवडणूक साक्षरतेला चालना देण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावणार आहेत. त्यानंतर महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार असून तशा पद्धतीने या कार्यक्रमांचे नियोजन मुंबई विद्यापीठ करत असल्याचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.

सदर उपक्रम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तार कार्यात सहभाग घेतलेल्या ३६१ पदवी महाविद्यालयांच्या विस्तार कार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह नियमितपणे आयोजित केला जाणार आहे.

मुंबई विद्यापीठातील विविध महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारे शैक्षणिक विस्तार उपक्रम केले जातात व समाजोपयोगी अध्ययन ऊपक्रम शैक्षणिक विस्तार कार्य प्रकल्पांच्या माध्यमातून राबवण्यात येतात. विविध शैक्षणिक आणि तांत्रिक संसाधनांसह आजीवन अध्ययन व विस्तार विभाग समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याच्या विशिष्ट उद्देशाने समुदाय आधारित शैक्षणिक विस्तार कार्य उपक्रम राबवत आहे. पथनाट्य, प्रदर्शन, भित्तीचित्र, प्रबोधन गीते, वक्तृत्व, पोवाडा, सर्वेक्षण, वक्तृत्व, परिसंवाद आणि परिषदा अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी सामाजिक समस्यांबद्दल व शासकीय धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून विभागाने या वर्षी निवडणूक साक्षरता जागृती उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन विभागाचे प्रा. कुणाल जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग व राज्य निवडणूक आयोग, कलिना निवडणूक प्रभाग येथील कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले आहे.

Dual Degree : मुंबई विद्यापीठात मिळेल आता दुहेरी पदवीचे शिक्षण; फ्रांसच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.