Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मकर संक्रांती निमित्त सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन

6

पुणे,दि.१५ :- मकर संक्रांतीनिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने पतंग महोत्सवात आयोजन विविध आकार-प्रकारांच्या रंगी-बेरंगी पतंग उडविण्याचा आनंद बालगोपाळांनी घेतला. या पतंग महोत्सवात आयोजन सरचिटणीस भाजपा कोथरुड उत्तर विधानसभा, संस्थापक अध्यक्ष. सोशल फाउंडेशनचे सचिन दळवी, यांनी केले होते व ते सोताही सहभागी झाले होते. पतंग महोत्सवात सोमेश्वर वाडी परिसरातील अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला होता.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

चिमुकल्यांना पतंग आणि चक्रीचे वाटप :मकरसंक्रांतीनिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्यावतीनं आयोजित पतंग महोत्सवात सचिन दळवी यांनी लहान मुलांसह पतंग उडविण्याचा आनंद लुटला. तसंच त्यांनी स्पर्धकांना पतंग मांजासह साहित्याचं वाटप देखील केलं. तसंच पतंग महोत्सवानिमित्त सचिन दळवी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अमित बामगुडे(कोथरुड विधानसभा मतदार संघ (ऊ) सचिव), अनिकेत चव्हाण(कोथरुड विधानसभा मतदार संघ (ऊ) सचिव), विष्णु काकडे, गोकुळ जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.