Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चैन स्नॅचर जेरबंद,पर्वती
पोलिसांची कामगिरी….
पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १०/०१/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. चे सुमारास पर्वती पोलिस स्टेशन हद्दीतील तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर पुणे येथे जेष्ठ महिला फिर्यादी या सायंकाळी रस्त्यावरुन पायी फिरत असताना त्यांचे पाठीमागुन एक स्कुटर चालक आला व त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेला होता. याबाबत पर्वती पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. १७ / २०२४ भा.द.वि कलम ३९२ असा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयांचा तपास करीत असताना नमुद भागातील उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्हि. फुटेजेस् तपासण्यात आले तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सहकारनगर भागामध्ये येण्याचे व जाण्याचे व संशयीत ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील जवळपास ३०० ते ३५० सी.सी.टी.व्हि. फुटेज पाहत नारायण पेठ लक्ष्मीरोड पुणे पर्यंत पाहणी केली. यातील अज्ञात चैन स्नॅचरचा माग काढत असताना पोहवा प्रकाश मरगजे, पोलिस शिपाई अमित चिव्हे यांना दाखल गुन्हयांतील चैन स्नॅचर बाबत सी.सी.टी.व्हि. तपासणीत दाखल गुन्हयांतील आरोपी हा लक्ष्मी रोड येथे गाडीसह उभा आहे असे दिसुन आले. सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवल्याने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे तपास पथक वरील ठिकाणी रवाना झाले. त्यांनी रस्त्यांवर सापळा लावुन अत्यंत शिताफीने आरोपीस पकडले. त्यांचेकडुन त्यांने गुन्हयांत चोरलेले दोन तोळे वजानाची सोन्याची चैन व दुचाकी असा १,३०,०००/-रु कि चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. पकडलेल्या आरोपीचे नाव शशिकांत यशवंत पाटोळे वय-३२ वर्षे रा लेन नं
१४, दत्तमंदीर जवळ जनता वसाहत, पर्वती पुणे ०९ असे आहे.
आरोपीस अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत कबुली दिली असुन दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने सांगितले की, शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने त्याने चैन स्नॅचिंग केली आहे. त्यास नमुद गुन्हयात काल दि. १४/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आले असुन दाखल गुन्हयांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,
प्रविणकुमार पाटील, पोलिस उप-आयुक्त परि. ३ संभाजी कदम, सहा. पोलिस आयुक्त सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उप-
निरीक्षक चंद्रकांत कामठे, पो. हवा. प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, अमोल दबडे, दयानंद तेलंगे- पाटील, प्रशांत शिंदे, पुरुषोतम गुन्ला, सुर्या जाधव आणि सद्दाम शेख यांनी केली आहे.