Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सांगाड्यावरुन म्रुतदेहाची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा…

8

परभणी पोलिसांनी सांगाड्याची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा…

परभणी (प्रतिनिधी) – परभणी ग्रामीण पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर सांगाड्याची ओळख पटवून खुनाच्या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. आरोपी नामे शेख उमर शेख रसूल (वय 38 वर्षे), रा. पेडगाव, ता.जि. परभणी याला अटक केली आहे. या प्रकरणी शेख अकबर शेख नूर (वय 49 वर्षे), रा.आनंद नगर पेडगाव, ता.जि. परभणी यांनी परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं.कलम 302, 15/2024 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.16जानेवारी) रोजी पारवा शिवारात मानवी सांगाडा असल्याची बातमी हाती लागताच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. सदर सांगाडा व परिस्थितीची पाहणी केली असता सदर घटना घातपात दिसून येत असल्याने पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी तात्काळ परभणी ग्रामीण पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मयातची ओळख पटवून खूनाच्या आरोपीचा शोध लाऊन आरोपी ताब्यात घेणे बाबत मार्गदर्शक सूचना व आदेश दिले होते. त्यावरून आजूबाजूच्या परिसरात माहिती घेत असताना सदर सांगाड्यावरून मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना लगेच यश आले. त्यावरून (दि.16जानेवारी) रोजी पो.स्टे. परभणी ग्रामीण गूरन 15/2024 कलम 302 भा.दं.वि. प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा परभणी पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी स.पो.नी. .पी.डी. भारती, पो.उप-नि गोपीनाथ वाघमारे व पोउपनि अजित बिरादार असे स्थागूशाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह वेगवेगळे पथके तयार करून रवाना करण्यात आले. त्यानूसार सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, सदर गून्हा आरोपी नामे शेख उमर शेख रसूल, (वय ३८ वर्षे), रा. पेडगाव याने केला आहे अशी खात्रीशीर माहीती गुप्त बातमीदार यांचेकडून मिळाल्यावरून तसेच तांत्रिक बाबिवरून दिसून येत असल्याने त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली आसता, त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. आरोपीने मयताचे वडिलांना 2,05,000 रूपये दिले होते. तसेच यातील मयतासोबत पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतले होते. परंतू ते मला माझे उसने घेतलेले पैसे देत नव्हते. तसेच मयत अल्ताफ हा सदरचे पैसे त्याचे वडील अकबर बाबा यास देऊ देत नव्हता. त्याचा राग मनात धरून आरोपी मयतास एक जिवे मारल्याचे सांगता असल्याने त्यास पुढील तपासकामी पोलिस ठाणे परभणी ग्रामीण यांच्या ताब्यात दिले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक रागसुधा आर. व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्हि.डी.चव्हाण, स.पो.नि. पी.डी. भारती, स्था.गु.शा. पोउनि अजित बिरादार, गोपिनाथ वाघमारे स्था.गु.शा. परभणी, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसमुंद्रे, दिलावर खान, विलास सातपुते, राहुल परसुडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विष्णु चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, निलेश परसोडे, येख रफियोद्दीन, हनुमान ढगे, नामदेव डुब्बे, मधुकर ढवळे, राम पौळ, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रोवार, संजय घुगे, रविकुमार जाधव, कैलास केंद्रे, यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.