Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत मोटारसायकल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात,१७ मोटारसायकल केल्या जप्त….

8

सिटी कोतवाली पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक…

अमरावती शहर (प्रतिनिधी)- सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अनेक ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे. या मध्ये त्याच्याकडून गुन्ह्यातील एकुण 17 मोटार सायकल ज्यांची किं. 7,70,000/- रु. या जप्त केल्या आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, पो.स्टे. सिटी कोतवाली अमरावती शहर येथे (दि.13सप्टेंबर 2023) रोजी फिर्यादी नामे संजय शेषरावजी तरेकर (वय 55 वर्ष), रा उत्कर्ष, नगर अमरावती यांनी पो.स्टे. सिटी कोतवाली येथे फिर्यादी यांची मोटार सायकल हिरो शाईन कंपनीची गाडी क्र. MH27-BC-2658 कि. 20000/- रू. ही मोटार सायकल घेऊन कॉटन मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी आले व त्यांनी त्यांची मोटार सायकल हि पंचमुखी हनुमान मंदीर जवळ अमरावती येथे लाऊन ते कॉटन मार्केट येथे भाजीपाला घेण्यासाठी गेले. व काही वेळानंतर परत आले असता सदर मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी गाडी दिसुन आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा दिलेल्या फिर्यादीवरून वरून पोस्टे. अप न 406/2023 कलम 379 भादवि. चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करीत असताना यातील अधिकारी व अंमलदार यांनी (दि.21जनेवारी 2024) रोजी गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी संतोष देवराव बोबडे (वय 38 वर्षे), रा.कुरुम, ता.मुर्तीजापुर, जि.अकोला याला गुन्ह्यात अटक करून आरोपी कडुन गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल 1) हिरो शाईन कंपनीची गाडी क्र. MH 27-BC-2658 कि. 20,000 रु. व इतर गुन्ह्यातील मोटार सायकल फॅशन प्रो. 8, होन्डा शाईन 7 ड्रिमयुगा 1 बजाज डिसकवर 01 अशा एकुण 17 मोटार सायकल ज्याची किं. 7,70,000 /- रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती शहर, पोलिस उपायुक्त परीमंडळ – 2, सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजापेठ विभाग, शिवाजीराव बचाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार बाकसे,महीला पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर पो.उपनि. एस. एस. चिपडे सफौ रंगराव जाधव, पोहवा मलिक अहेमद, नापोशि. आशीष इंगळेकर, प्रमोद हरणे पोशि पंकज अंभोरे, आंनद जाधव पुरु फकिरावाले, नरेद्र उगळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.