Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन SDPO वर्धा यांचे पथकाने पकडले,पोलिसांना पाहताच चालक,मालक फरार…

10


क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे वाहन SDPO वर्धा यांचे पथकाने पकडले,पोलिसांना पाहताच चालक,मालक फरार…




नाकाबंदी दरम्यान उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा पथकाने 
गोवंशीय जनावर असलेले क्रुरतेने वाहतुक करीत असलेले वाहन पोलिसांना बघताच सोडुन पळुन गेले,२ गोवंशीय जनावरांची पोलिसांनी केली सुटका…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालय, वर्धा यांना दि. 25. रोजी आदीवासी कॉलोनी रामनगर वर्धा येथे रात्रदरम्यान नाकेबंदी करीत असता  एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन संशयीत रित्या येतांना दिसले
त्या वाहनास जवळील असलेल्या टॅार्चच्या साहाय्याने  थाबंण्याचा इशारा केला असता सदर वाहन आमचे जवळ न थांबता पुढे जावुन  थांबविले व वाहनाचे सामोरील दरवाजे उघडुन दोन अज्ञात इसम हे अंधाराचा फायदा घेवुन गल्लीतुन पसार झाले

घटनास्थळावरुन एक टाटा कंपनीची सफारी पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन क्र MH 14 EP 7775 किमंत 15,00,000/- रू तसेच त्या वाहनामधील

1 लाल रंगाचा गोरा, 1 पांढऱ्या रंगाची गाय अंदाजे वय 02
03 वर्ष वयोगटातील किंमत अंदाजे 40,000/- रू. एकुण  किंमत 15,40,000/- रू. चा माल मिळुन आला. वरून पंचनामा करुन सदर गाडी व २ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली.व
पोलिस स्टेशन रामनगर, वर्धा येथे अपराध क्रमांक 51 / कलम 11 (1) (घ) (ड) (झ) 2024 प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशन चे अधिकारी  करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  नूरूल हसन.,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, प्रमोद मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो.उप.नि परवेज खॉन, पो. हवा. अमर लाखे, पो. शि, पवन निलेकर, मंगेश चावरे, समीर शेख यांनी यशस्वी रित्या पार पाडली.





Leave A Reply

Your email address will not be published.