Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात गौरव पुरस्कार व हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ संपन्न

7

पुणे,दि.२६:- प्रजासत्ताक दिन निमित्त तेली समाजाच्या वतीने श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड यांनी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे दि.२६ रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होत,

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ संगीताताई अभिजीत पन्हाळे संचालिका रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाउंडेशन. प्रमुख पाहुणे सौ वसुंधरा ताई उबाळे सरपंच वाघोली, सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष श्री शिवदासजी उबाळेे, संस्थेचे आधारस्तंभ श्रीमती प्रमिलाताई किरवे, लोहगावच्या माजी सरपंच श्वेता ताई काळे, शाहू बँकेच्या संचालिका मंगलाताई जाधव, अर्चनाताई खोंड, नंदाताई धोत्रे, माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव, ज्योतीताई भादेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते,

दरवर्षीप्रमाणे तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ व वर्षभर विविध

कार्यक्रमाचे तेली समाजाच्या वतीने कोथरूड येथे तेली समाजातील श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सदाशिव भोज, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येते.

व श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड.यांच्या वतीने वधू-वरांची लग्न जमवण्यासाठी समाजामध्ये काम करत आहे व प्रजासत्ताक दिन निमित्त पुण्यातील तेली समाजाच्या श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने श्री संताजी प्रतिष्ठान गौरव
पुरस्कार दिलीप फलटणकर यांना श्री संताजी प्रतिष्ठान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यांना करण्यात आला आहे.

व होम मिनिस्टर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त तेली समाजातील महिलांनी हळदी कुंकू निमित्त आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य कलानुसार दिसते तसेच वैचारिक / बौद्धिक देवाण घेवाण होते म्हणून हा सण आपण साजरा करतो.

हळदी कुंकू हे हिंदू धर्माचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे, कुंकुम तिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुध्दी पूजेचे अधिष्ठान आहे.

यावेळी या कार्यक्रमासाठी संताजी प्रतिष्ठांच्या सर्व कार्यकारिणीने कष्ट घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला अध्यक्ष सुनंदाताई जाधव यांनी केले तर प्रास्ताविक ज्योतीताई धोत्रे यांनी केले. व आभार सीमाताई भोज यांनी मानले. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

व पुण्यातील तेली समाजातील वेगवेगळ्या संस्था व संघटनेचे पद अधिकारी व कार्यकर्ते वधु वर व पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.