Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
निर्दयतेने कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, गुन्हे शाखा युनीट ५ ची कामगिरी, ग एकुण २२,४०,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…..
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८.रोजी रात्री १२.२५ वा. सुमारास, गुन्हेशाखा पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पोलिस स्टेशन पारडी अंतर्गत जबलपुर – हैद्राबाद हायवे रोडवर, न्यु शर्मा ढाबा जवळ, पारडी, नागपूर येथे टाटा कंपनीचा ट्रक क. एम. एच. ४० वाय ९०८२ ला थांबवुन कारवाई केली असता, त्यामध्ये आरोपींनी एकुण ३० जिवंत
गोवंशीय जनावरे कोंबुन, त्यांना कृरतेने व निर्दयतेने वागणुक देवुन, त्यांचे चारा-पाण्याची व्यवस्था न करता, अवैधरित्या कत्तल करण्याकरीता वाहतुक करीत असतांना समक्ष मिळुन आले. यातील
१) ईरशाद उर्फ राजा अब्दुल सय्यद, वय ३४ वर्षे, रा. पंकज लॉन जवळ, सईद नगर, जुनी कामठी, नागपुर
हा पाहिजे
२) बंटी कुरेशी, वय ३५ वर्षे, रा. भाजी मंडी, कामठी, नागपूर
३) शाहनवाज उर्फ पाया, वय ३२ वर्षे, रा. सैलाब नगर,नवी कामठी
४) बंटी कुरेशी याचा मित्र यांचेसह संगणमत करून नमुद जनावरांची वाहतुक करताना मिळुन आला. आरोपीचे
ताब्यातुन नमुद वाहन, ३० गोवंशीय जनावरे असा एकुण २२,४०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकुण ३० जिवंत गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात आली व त्यांना गोशाळा येथे दाखल करण्यात आले.व सदर आरोपींविरूध्द पोलिस स्टेशन पारडी येथे कलम ५ (अ) (१) (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६, सहकलम ११(ड) प्राणी कुरता अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करून एका आरोपी यांस अटक करून, मुद्देमालासह पारडी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कानगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे ,अपर पोलिस आयुक्त गुन्हे संजय पाटील यांचे आदेशानुसार पोलिस उपायुक्त,गुन्हे ,(डिटेक्शन) सुदर्क्षन मोमाक्का यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट ५ चे पोलिस निरीक्षक राहुल शिरे, सपोनि. भोपळे, पोहवा.महादेव थोटे, रामनरेश यादव, राजेंद्र टाकळीकर यांनी केली.