Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे शहराचे नवीन पोलिस आयुक्त.अमितेश कुमार,तर पु

9

पुणे,दि.०२ पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्याचे आदेश गृह विभागाने बुधवारी सायंकाळी दिले. त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तपदी कोकण परीक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण पावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी
पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त.
अमितेश कुमार.यांनी दि.१ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेशक म्हणून बढती झाली आहे. राज्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढत्या करण्यात आल्या आहेत

1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अमितेश कुमार यांची पुणे शहर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी सर्वाधिक काळ नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून काम करण्याचा विक्रम केला आहे. साल 2007 मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा क्रिकेट सामना सुरु असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहीमचा हस्तक मनोज कोचर यांच्या संभाषण रेकॉर्ड करून क्रिकेट जगात खळबळ माजविली होती. या कामगिरीमुळे अमितेश यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. अमितेश कुमार यांनी औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणूनही काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.

रितेश कुमार होमगार्डचे महासमादेश
पुण्याचे पोलिस आयु्क्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती करण्यात आली आहे. होमगार्डचे अपर पोलिस महासंचालक आणि उप महासमादेशक असलेले प्रभात कुमार यांची नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्यचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त असलेल्या शिरीष जैन यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून बढती झाली आहे. महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे यांची महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बढती झाली आहे.

पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

पुण्यात गेला काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान अमितेश कुमार यांच्या समोर राहणार आहे. या बाबत अमितेश कुमार म्हणाले, पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले हे प्राधान्य राहणार आहे. या साठी बेसिक पोलिसिंग, व्हिजीबल पोलिसिंग, लॉ अँड ऑर्डर यावर विशेष दिला जाणार आहे. वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ञ पोलिसांचे पथक तयार करणे आणि वाढत्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील पुण्यात कायदा आणि सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे अमितेश कुमार म्हणाले.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष नियोजन

पुण्यात वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या झाली आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी विशेष उपाय करण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतूक कोंडीला वैतागलेल्या पुणेकरांची आगामी काळात खरंच सुटका होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे,

तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक

पुणे ग्रामीणचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलिस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिकत् नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. चाळीसगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील.

Leave A Reply

Your email address will not be published.