Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत गुंड हातभट्टीवाला याला MPDA कायद्यान्वये भंडारा पोलिसांनी केले स्थानबध्द…

7


सराईत गुंड हातभट्टीवाला याला MPDA कायद्यान्वये  भंडारा पोलिसांनी केले स्थानबध्द…




हातभट्टीवाला जितेंद्र उर्फ जितू रणभिड मेश्राम यास एमपीडीए
कायद्यान्वये केली जिल्हा कारागृह भंडारा येथे रवानगी….
@पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे मार्गदर्शनाखाली मागील चार महिण्यातील सातवी कारवाई@

भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सराईत गुंड
जितेंद्र रनभिड मेश्राम, वय 39 वर्ष, रा. संगम पुनर्वसन ता. जि. भंडारा हा पोलिस स्टेशन जवाहरनगर परीसरातील रहिवासी असुन तो आपल्या सोबत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन हात
भट्टी मोहफुलाची दारू गाळून हातभट्टीवाला व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती. जितेंद्र रनभिड मेश्राम हा मागील 5 वर्षा पासुन हातभट्टी दारू गाळण्याचे व्यवसायात सक्रिय असुन त्याचेवर पोलिस ठाणे जवाहरनगर येथे हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री अशा प्रकारचे 8 गुन्हे दाखल असुन काही गुन्ह्यात दारू निर्माण करुन मिळालेल्या पैशाच्या बळावर निर्दोष सुटका करीत आहे. त्याने त्याची एमपीडीए कायद्यान्वये हातभट्टीवाला अशी ओळख निर्माण केली होती. त्याचे कृत्यामुळे जवाहरनगर परिसरातील तील मुले दारूच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाज विघातक
व्यक्तीवर अंकुश बसविने गरजेचे होते. अशा सराईत गुन्हेगारास कायद्याचे कसोटीत बसवुन त्याचे गुन्हेगारीचा अस्त करणे हाच
एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शानात जितेंद्र रनभिड मेश्राम, वय 39 वर्ष, रा. संगम पुनर्वसन ता.जि. भंडारा (महाराष्ट्र) याचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला. दिनांक 2/02/2024 रोजी जिल्हाधिकारी, भंडारा श्री. योगेश कुंभेजकर यांचे स्थानबद्धता
आदेशाने ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह भंडारा येथे दाखल करण्यात आले. यांनतर सुध्दा अशा हातभट्टीवाल्यांचे गुन्हे अभिलेख तपासुन एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहीत मतानी व अपर पोलिस अधीक्षक. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ.अशोक बागुल यांचे मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर
पोलिस निरीक्षक (स्था. गु.शा.), सुधीर बोरकुटे सहा. पोलिस निरीक्षक, जवाहरनगर, पो.हवा. राजेश पंचबुधे,नापोशि अंकोश पुराम, पोहवा. गिरीश बोरकर, मंगल कुथे, पो.ना. लोकेश सिंगाडे यांनी केली.





Leave A Reply

Your email address will not be published.