Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा ट्रक व टाटा सुमो देवलापार पोलिसांनी पकडून त्यातुन होणारी एकुण २५ गोवंशीय जनावरांना कत्तलीपासुन दिले जिवनदान….
देवलापार(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलिस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलिस स्टेशन हद्दीत आपले अधिनस्त असलेल्या पथकासह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर कडुन नागपुर कडे देवालापार मार्गे एका ट्रकमध्ये अवैध्यरित्या गोवंशीय जनावर वाहतूक करून देवलापार दिशेने येत आहे. अशा माहीती वरून पोस्टे समोर देवलापार समोर नॅशनल हायवे क्र. ४४ जबलपुर ते नागपुर रोडवर पोलिस पथकासह नाकाबंदी केली असता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाहन क्र. MH-29/R-4295 ला नाकाबंदीच्या ठिकाणी थांबविण्याचा प्रयत्न केला असता
ते सदर ठिकाणी न थांबता नागपुर दिशेने पळुन गेले तरी सदर वाहनाचा पाठलाग करून टोल नाका खुमारी जवळ तपासणी केली असता वाहनात आखुड दोरखंडाने गोवंशांचे तोंड, मान, पाय अत्यंत क्रुरतेने व निर्दयतेने बांधलेले एकुण ०७ गोवंशीय जनावरे (गायी) असे एकुन किंमत १,०५,००० /- रू व वाहन क्र. MH-29/R-4295 किंमत ५,००,००० / – रू असा एकुण ६,०५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करुन जनावरांची योग्यरित्या चारा-पाणी व देखभाल होणे करीता सदरची जनावरे गो-शाळेत दाखल करण्यात आले व त्यावरुन अप क्र. २९/ २०२४ कलम २७९ भादवी सहकलम ११ (१) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ५ (अ), ९ महा प्राणि संरक्षण सहकलम १८४ मोवाका सहकलम ११९ मपोका अन्वये गुन्हा नोंद केला असुन तपास सुरु आहे. तसेच दि.०२/०२/२०२४ रोजी मध्य रात्री गुप्त बातमीदाराचे बातमी वरून नॅशनल हायवे क्र. ४४ जबलपुर ते नागपुर जाणारा रोड मानेगावटेक
येथे स्टाफसह नाकाबंदी लावुन खबरेप्रमाणे ट्रक वाहन क्र. MH-29 / T-2003 ला नाकाबंदी ठिकाणी थांबवुन तपासणी केली असता ट्रक मध्ये आखुड दोरखंडाने गोवंशांचे तोंड, मान, पाय अत्यंत क्रुरतेने व निर्दयतेने बांधलेले जिवंत १८ गोवंश (बैल) त्यांपैकी ०४ गोवंश मृत जिवंत गोवंश किंमत २,७०,००० / – रू व वाहन ट्रक क्र. MH-
29/ T-2003 किंमती १५,००,०००/- रू असा एकुण १७,७०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करुन जनावरांची योग्यरित्या चारा-पाणी व देखभाल होणे करीता सदरची जनावरे गो-शाळेत दाखल करण्यात आले व पोस्टे ला अप क्र. ३० / २०२४ कलम २७९, ४२९ भादंवी सहकलम ११(१) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम ५(अ), ९ महा. प्राणि संरक्षण सहकलम १८४ मोवाका सहकलम ११९ मपोका. अन्वये गुन्हा नोंद असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर दोन्ही गुन्ह्यातील चालक अंधाराचा फायदा घेऊन वाहन तिथेच टाकुन फरार झालेत
सदरची कार्यवाही ही हर्ष ए. पोद्दार, पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण, मा. श्री. डॉ. संदिप पखाले अपर पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण, आशित कांबळे,सहा. पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनात सपोनि. राजेश पाटील ठाणेदार पो.स्टे. देवलापार, पोहवा राहुल रंगारी, नापोशि शिवा नागपुरे,प्रमोद मडावी, पोशि केशव फड, कांती हराळ, मनिष चौकसे, सचिन येळकर, चापोहवा कविराजवार यांनी केली
असून सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहवा राहुल रंगारी हे करीत आहेत.