Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

येरवडा कारागृहातील कैद्यांन वर आता 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वॉच

14

पुणे,दि.०४:- पुणे येरवडा कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरे च्या कंट्रोल रूमचे उद्घाटन गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते शनिवारी (ता.३) रोजी झाले. बंद्यांच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे याकरीता बंद्यांसाठी सोईसुविधा वाढविण्यावर जास्त भर देण्यात येत असल्याचे यावेळी श्रीमती रस्तोगी यांनी सांगितले.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

राज्यभरातील १६ मध्यवर्ती कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुण्यातून करण्यात आली. सीसीटीव्हीमुळे कारागृह प्रशासनाला एकाच ठिकाणावरून कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. राज्यातील विविध कारागृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे सर्व कॅमेरे कारागृहातील नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रूम) जोडले जाणार आहेत.

कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर आणि उपमहानिरिक्षक स्वाती साठे यावेळी उपस्थित होते.

रस्तोगी पुढे म्हणाल्या की, बंद्यांसाठी ई-मुलाखत, स्मार्ट कार्डद्वारे दुरध्वनी सुविधा, आहाराच्या दर्जात सुधारणा, गळाभेट, कौशल्य विकास, शैक्षणिक अभ्यासक्रमात वाढ आदी सुविधा देण्यात येत आहेत. बंद्यांची सुरक्षा अबाधीत ठेवण्यासाठी आधुनिकीकरणांतर्गत विविध यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या गरीब कैदी योजनेअंतर्गत गरीब बंद्यांना जामीनाची रक्कम भरण्यासाठी शासनाकडून निधी
उपलब्ध करून दिला जाईल व त्यांची कारागृहातून सुटका होईल. त्यामुळे कारागृहातील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता म्हणाले, लवकरच बंद्यांसाठी असणारी कॅन्टीन सुविधा ही कॅशलेस पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बंद्यांचे नातेवाईक ऑनलाईन पेमेंट करू शकतील आणि कारागृहातील बंदी कॅशलेस पद्धतीने त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू घेऊ शकतील. कारागृह उद्योगांचा विकास करण्यासाठी एक-एक उद्योगाचे आधुनिकीकरण करण्यात येईल व त्यादृष्टीने बंद्यांना कौशल्य शिकविण्यात येतील.

कार्यक्रमाला कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ , कारागृहातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.