Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वाहनचोरी व घरफोडी करणारा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात…

8

 घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्यास ईमामवाडा पोलिसांनी घेतले ताब्यात,५ गुन्हे केले उघड….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. २४ नोव्हेबर २०२३ चे ते दि. २६ नोव्हेंबर २०२३  चे दरम्यान, पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत घर नं. १३, जुने नवभारत प्रेस कॉटन मार्केट जवळ, ईमामवाडा येथे राहणाच्या प्रिया प्रशांत ढेरे वय ३० वर्षे, यांचे वडील शेषराव झिबलजी बलकुंडे वय ६० वर्ष रा. प्लॉट नं. २३५, ऊंटखाना मेडीकल चौक,ईमामवाडा, नागपूर हे आपले घराला कुलूप लावुन परिवारासह राजस्थान येथे गेले असता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे वडीलांचे घराचे दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील बेडरूम मधील अलमारीतुन चांदीचे दागिने
रोख ३,००० /- रू व ईतर साहित्य किमती अंदाजे १९,८०० /- रू चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे ईमामवाडा येथे आरोपी विरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासा दरम्यान ईमामवाडा पोलिसांनी तांत्रीक तपास करून खात्रीशीर माहितीवरून पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम. एच ४९ के ६६२५ वर जाणारा आरोपी

रितेश उर्फ ददु अश्वजीत वानखेडे वय २१ वर्ष रा. पाचनल चौक, रामबाग, ईमामवाडा, नागपूर

यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच त्यास त्याचे जवळ असलेली अॅक्टीव्हा वाहना संबंधी विचारपूस केली असता त्याने ती गाडी पोलिस ठाणे नंदनवन हद्दीतुन रमना मारोती परीसरातुन चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन अॅक्टीव्हा गाडी जप्त करून आरोपीस अटक करून मा. न्यायालयातुन आरोपीची पोलिस कोठडी प्राप्त करून आरोपीची सखोल विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हयाच्या व्यतीरीक्त पोलिस ठाणे नंदनवन हद्दीतुन एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी व पोलिस ठाणे अजनी हद्दीतुन दोन पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी चोरी केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताब्यातुन
गुन्हयात चोरी गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, ३ मोबाईल चार अॅक्टीव्हा गाडी असा एकुण किमती अंदाजे १,४२,०००/- रू चा जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे नंदनवन पोलिसांनी ५ गुन्हे उघकीस आणले. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,पोलिस उपायुक्त (परि क्र. ४) विजयकांत सागर,सहा पोलिस आयुक्त हेमंत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,पोउपनि कोल्हारे, पोहवा गणेश घुगूलकर, अमीत प्रात्रे, रविन्द्र राउत, विरेन्द्र गुळरांधे, भगवतीकुमार ठाकुर, संदीप बोरसरे, नापोअ. सुशील रेवतकर, पोशि. चंद्रशेखर डेकाटे, देवेन्द्र बोंडे, रंजीत सक्करवार यांनी केली.

The post वाहनचोरी व घरफोडी करणारा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात… appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.