Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

EVM मशीन बाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल,तर स

7

पुणे,दि.०७:- ईव्हीएम मशीन संदर्भात पुण्यातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांनी म्हटलेय.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

सुप्रीम कोर्टानं ही याचिका दाखल केली असून या संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

पुण्यातील काँग्रेसचे नेते, प्रदेश सरचिटनीस अॅढ अभय छाजेडा आणि प्रदेश कार्यकरणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे बी पारडीवाला, न्या मनोज मिश्रा यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, कसबा विधनसभा पोटनिवडणीदरम्यान काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत मागणी केली होती. पण ती निवडणूक आयोगानं फेटाळली. निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाची तारीख, वेळेसह स्लिप छापून मिळावी, अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टात धाव घेतली, असे छाजेड यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.