Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे, शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार

8

मुंबई,दि.०६:- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल दिला आहे. त्यानुसार पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

“निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्वीकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही काल ही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो,” अशी प्रतिक्रिया या निकालानंतर अजित पवार यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त करतो.

या निकालानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले. “कोणत्याही पक्षात घडामोडी घडल्यावर न्याय मागण्याची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही आमचं म्हणणं मांडलं. त्यावर तारखा पडल्या. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं. आज एनीसीपीचं घड्याळ, झेंडा या सगळ्या गोष्टी आम्हा सर्वांना म्हणजे 50 आमदारांना निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. मी विनम्रपणे तो स्वीकार करतो. आयोगाचे आभार मानतो. हेच मला सांगायचं होतं.”

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नवी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर नवी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहीमेचं नाव आहे. शरद पवार गटाकडून या नव्या मोहीमेची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे. नुकतंच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शरद पवार यांनी शुन्यातून पक्ष उभा केला. शुन्यातून स्वत:चं आयुष्य उभं केलं. त्यांचं कुणीही काका, मामा, वडील राजकारणात नव्हते. त्यांनी स्वत: सुरु केलेला हा पक्ष आहे. ते पक्षाचे फाऊंडर मेंबर असूनही शुन्यातून सुरु केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. पण मला त्याचं काही आश्चर्य वाटत नाही. सुप्रीम कोर्टाची आधीची ऑर्डर वाचली असेल तर आमदारांच्या आकडेवारीवरुन पक्ष ठरत नाही तर संघटना ठरवते. संघटना ही शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे या ऑर्डर विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.