Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिकारीसाठी वापरात येणारी भरमार ठासणीची बंदुक स्थागुशा पथकाने घेतली ताब्यात…

8


शिकारीसाठी वापरात येणारी भरमार ठासणीची बंदुक स्थागुशा पथकाने घेतली ताब्यात…




अचलपुर तालुक्यातील बोरगाव पेठ येथुन भरमार बंदुक(अग्नीशस्त्र) स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त….

अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात
अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाप्रमाणे याआधीच अचलपुर येथुन ०५ धारदार शस्त्रे जप्त करुन  कार्यवाही करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिनांक १०/०२/२०२४ रोजी पोलिस स्टेशन सरमसपुरा हद्दीतील ग्राम बोरगाव पेठ येथुन गोपनिय खबरेचे आधारे सुरेश विष्णु नांदणे वय ३२ वर्ष रा.बोरगाव पेठ ता. अचलपुर याचे राहते घरी पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरुन लाकडी बट व लोखंडी बॅरल असलेली भरमार बंदुक (अग्नीशस्त्र) मिळुन आली. त्यास बंदुक बाळगण्याचा उद्देश व परवानाची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवुन कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने त्याचे कडुन सदरची बंदुक जप्त करण्यात आली असुन आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सरमसपुरा येथे कलम ३,२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला असुन आरोपी यास पुढील कार्यवाही
करीता पोलिस स्टेशन सरमसपुरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. यानंतर सुध्दा जिल्हयात अवैधशस्त्रे बाळगणारे विरुध्द कार्यवाही सत्र सुरुच राहणार आहे.
सदरची कारवाई  विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. पंकज कुमावत,अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा.यांचे नेतृत्वात सहा पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व–हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने यांनी केली.





Leave A Reply

Your email address will not be published.