Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,४ मोटारसायकल केल्या हस्तगत…

11


सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,४ मोटारसायकल केल्या हस्तगत…




सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,4 मोटरसायकल केल्या जप्त….

लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते . त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 14/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी बाभळगाव चौक परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 14 फेब्रुवारी  रोजी सदर पथक तात्काळ बाभळगाव चौक परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव

1) मोईन अकबर चौधरी, वय 22 वर्ष, राहणार चिल्ले कॉम्प्लेक्स जवळ, शास्त्रीनगर लातूर. असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल काही महिन्यापूर्वी बाभळगाव रोड वरील एका पेट्रोल पंपा समोरून मी व एक अल्पवयीन बालक असे दोघे मिळून चोरी केलेली आहे. तसेच आरोपी नामे *अखिल महबूब शेख, राहणार परळी जिल्हा बीड.* याने कोठून तरी चोरून आणलेल्या आणखीन तीन मोटारसायकली विकण्यासाठी आमच्याकडे दिलेल्या असल्याचे सांगितले व ते काढून दिल्याने त्या मोटरसायकली नमूद आरोपीकडून जप्त केले आहे.
नमूद आरोपीकडून चोरीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 2 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस ठाणे विवेकानंद चौक तसेच पोलिस ठाणे बीड शहर येथील प्रत्येकी एक असे एकूण दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
नमूद आरोपीला पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलिस ठाणेचे पोलिस पुढील तपास करीत आहेत. बीड येथील आरोपीचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलिस अंमलदार नितीन कटारे, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, राजेश कंचे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी पार पाडली.





Leave A Reply

Your email address will not be published.