Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोणत्या ग्रहांवर पाणी सापडले?
सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरी ही NASA ची एक उडती प्रयोगशाळा आहे. हो! तुम्हालाही वाचून अश्चर्य वाटलं असेल. पण, या सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरीच्या माध्यमातून ब्रम्हांडात मोठ्या प्रमाणात शोधकार्य केले जातात. दरम्यान, ब्रम्हांडातील Iris आणि Massalia या दोन लघुग्रहांवर पाण्याचा शोध लागला आहे. त्यामुळे हे एक मोठं यश मानलं जातंय.
SOFIA कसं काम करतं?
सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरी हे कसं काम करतं याविषयी आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. एका विमानात NASA ने सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरी ही हवेत उडणारी प्रयोगशाळा बनवली आहे. ही प्रयोगशाळा ब्रम्हांडात शोधकार्य करते. सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरीला जर्मन एरोस्पेस सेंटर आणि NASA यांच्याकडून चालवले जाते. या प्रयोगशाळेत एक दुर्बीण बसवण्यात आली आहे. त्यामाध्यामातून हे संपूर्ण शोधकार्य चालते.
SOFIA मध्ये कोणता कॅमेरा?
सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरी या उडत्या प्रयोगशाळेत फेंट ऑब्जेक्ट इन्फ्रारेड कॅमेरा लावण्यात आला आहे. ब्रम्हांडातील इरिस आणि मस्सालिया या दोन लघुग्रहांवर पाण्याचा शोध लावण्यात फेंट ऑब्जेक्ट इन्फ्रारेड याचा मोलाचा वाटा आहे.
इतर २ लघुग्रहांवर काय सापडलं?
सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरी या प्रयोगशाळेने एकूण चार लघुग्रहांवर नजर ठेवली होती. त्यापैकी दोन लघुग्रह सिलिकेटने भरलेले आहे. कोणतेही शोधकार्य करताना ग्रह, लघुग्रह आणि उल्का यांच्या पृष्टभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या लांबीच्या माध्यमातून हे सर्व निरीक्षण केलं जातं.
इरिस आणि ‘मस्सालिया’विषयी अधिक
- इरिस १९९ किलोमिटर रुंद
- मस्सालिया १३५ किलोमिटर रुंद उल्का
- दोन्ही लघुग्रहांचे ऑर्बिट वेगळे
- पृथ्वीपासून २.३९ स्ट्रोनॉमिकल युनिट अंतर
पाण्याचा शोध लावणारे विमान निवृत्त
ज्या विमानाने इरिस आणि मस्सालिया या दोन लघुग्रहांवर पाण्याचा शोध लावला ते विमान पुढे काम नाही करू शकणार. त्यामुळे सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरी या उडत्या प्रयोगशाळेचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या विमानाने निवृत्त होताना देखील मानवाला जीवन देणाऱ्या पाण्याचा शोध लावत मोलाची कामगिरी केली आहे.
लघुग्रहांची निर्मिती कशी होते?
इरिस आणि मस्सालिया या लघुग्रहावर पाण्याचा शोध कसा लागला ते आपण पाहिलेत. पण, ब्रम्हांडातील हे लघुग्रह कसे निर्माण होतात. याविषयी सन अँटोनिया येथील Southwest Research Institute चे शास्त्रज्ञ एनेसिया एरेडेंडो यांनी सांगितले की, ग्रह किंवा लघुग्रह हे अनेक ग्रहांच्या पृष्टभागांचे मिश्रण असतात. पुढे ते सांगतात, ‘ग्रहांची निर्मिती होते तेव्हा लघुग्रह तयार होतात.’
दरम्यान, इरिस आणि मस्सालिया या लघुग्रहांवर पाण्याचा स्त्रोत सापडलाय. आता पुढे त्यासंदर्भात काय संशोधन होतं. याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत राहू.