Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्पा. च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांचा दणका, दोन महिलांची सुटका

8

पुणे,दि.१६:- पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथे एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या
वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

या कारवाईत थायलंड येथील दोन महिलांची सुटका करुन एका महिला स्पा मालकीणीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.15) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅट वर केली आहे.

मूकडा गेटाईसॉन्ग हीच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार रईसा समीर बेग (वय-38) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची
माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.
त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.