Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त….
नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी कामठी चे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, पो. ठाणे जुनी कामठी हद्दीत कमसरी बाजार जवळील शितला माता मंदीर समोर, कामठी,
नागपूर येथे टाटा कंपनीचे
१) योध्दा पिकअप क. एम. एच. ३० बी.डी ३९९६
२) एम.एच २८ बी.बी ४९९८
३)एम. एच ४० बी.एल ९१८२
यांना थांबवुन रेड कारवाई केली असता, त्यामधील पहिल्या वाहनात एकुण ११ जिवंत गोवंशीय जनावरे, दुसऱ्या वाहनात एकुण ०९ जिवंत गोवंशीय जनावरे आणि तिसऱ्या वाहनात एकुण ०९ जिवंत गोवंशीय जनावरे यांना कोंबुन, त्यांना करतेने व निर्दयतेने वागणुक देवुन, त्यांचे चारा-पाण्याची व्यवस्था न करता,
अवैधरित्या कत्तल करण्याकरीता वाहतुक करीत असतांना आरोपी क.
१) अब्दुल शाहिद वल्द अब्दुल रफीक, वय २४ वर्षे, रा. मोमीनपूरा ताज हॉटेल जवळ, तहसिल नागपुर
२) जाहीद खान वल्द बब्बू खान, वय ३४ वर्षे, रा. कामगार नगर, सार्वजनीक विहरी जवळ, कामठी नागपूर समक्ष मिळुन आले व पाहिजे आरोपी क.
३) फैजान, रा. भाजी मंडी, कामठी, नागपूर जो संधीचा फायदा घेवुन पळुन गेला. आरोपींनी संगणमत करून नमुद जनावरांची वाहतुक
करताना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन नमुद तिन वाहने व एकुण २९ गोवंशीय जनावरे असा एकुण १६,२५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकुण २९ जिवंत गोवंशीय जनावरे यांची सुटका करण्यात आली व त्यांना गोशाळा, पारडी, नागपूर येथे दाखल करण्यात आले. आरोपींविरूध्द पोलिस ठाणे जुनी कामठी येथे कलम ५(ब), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा – १९७६, सहकलम ११(ड) प्राणी कुरता अधिनियम १९६०, सहकलम ८३, १७७ मो. वा. का सहकलम ११९ म.पो का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ व २ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,पोलिस उपायुक्त परि क्र. ५ निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक परि क्र. ५ सहा पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकुर पोहवा रवी साहु,अरुन चांदने,पोशि अंकुश गजभिये योगेश ताथोड तसेच पोलिस निरीक्षक दिपक भिताडे पोलिस स्टेशन जुनी कामठी पोलिसांनी संयुक्तीकरित्या केली.