Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई सह रायगड हद्दीत तही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छम छम पहाटे पर्यंत सुरू

11

पुणे दिनांक १७ फेब्रुवारी ( झुंजार ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई सह रायगड हद्दीतील खालापूर येथे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रास छमछम चालवले जात आहेत.सर्व‌नियम धाब्यावर बसवून पहाटे प्रर्यत हे डान्स बार सुरू आहेत.मुंब‌ई रायगड हद्दीतील या डान्स बारला पोलिसांचे सुरक्षा कवच आहे.या डान्स बारवर पोलिसांनी छापे टाकून कडक कारवाई करावी.अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली आहे.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

दरम्यान याप्रकरणी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की.बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून या सिंडिकेट मधील बार चालक महिन्याला करोडो रुपये जमा करत आहेत.जमा झालेल्या पैशातून पोलिसांना व पोलिसांच्या खबऱ्यांना व स्थानिक सह काही पत्रकारांन सह गुंडाना या बारचालकांकडून हाप्ते दिले जात आहेत.त्या मुळे सिंडिकेटमधील डान्सबारवर पोलिस कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत.हे डान्सबार पहाटे पर्यंत सुरू असतात.दरम्यान याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर देखील या डान्सबारवर कारवाई केली जात नाही.या उलट या सिंडिकेट मधील बारचालक पोलिसांच्या आशीर्वादाने तक्रारदार यांना धमकावत आहे.व मारहाण देखील करत आहेत.या बाबत‌ अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्यामुळे मुंबई सह काही ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.