Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पोलिस आयुक्ताचे आदेशाने ईमामवाडा हद्दीतील कुख्यात गुंड अक्षय नागेश पाटील यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
नागपूर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक १६.०२.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे इमामवाडा, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड
अक्षय नागेश पाटील, वय २३ वर्षे, रा. इंदीरा नगर, जाटतरोडी नं. १, गडलींग किराणा स्टोअर्सजवळ, पोलिस ठाणे इमामवाडा, नागपूर शहर
यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्,वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाच्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक १६.०२.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. १६.०२.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
अक्षय नागेश पाटील, याचेविरूध्द पोलिस ठाणे इमामवाडा येथे आपखुशीने घातकशस्त्राने दुखापत करणे,जबरी चोरी करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन प्राणघातक नुकसान करणे, शिविगाळ करून दुखापत करणे, जबरी चोरी करून आपखुशीने दुखापत करणे, गैर निरोध करणे, घातक शस्त्रासह दरोडा घालण्याची तयारी करणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, दंगल करणे, आपखुशीने दुखापत करणे, घातक हत्यार जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबध्द इसमाविरूध्द सन २०२२ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी नुसार प्रतिबंध कारवाई करून बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली व त्याने पोलिस ठाणे इमामवाडा व अजनी हद्दीत गैरकाद्याची मंडळी जमवून शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, दरोडा घालण्याची तयारी करणे, घातक हत्यार जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अक्षय नागेश पाटील, याची अपराधिक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक, पोलिस ठाणे इमामवाडा नागपूर शहर यांनी नमुद आरोपीस स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलिस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा
आदेश पारित करून त्यास येरवडा, मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल नागपुर शहर ,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे,पोलिस उपायुक्त विजयकुमार सागर,सहाय्यक पोलिस आयुक्त हेमंत शिंदे,यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्छ पोलिस निरीक्षक ईमामवाडा कमलाकर गड्डीमे यांनी केली