Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

SDPO वर्धा यांचे पथकाने छापा टाकुन पकडली अवैधरित्या विक्रीकरीता आणलेली विदेशी दारु…

8

SDPO वर्धा उपविभागीय पथक यांनी सिंदी मेघे वर्धा येथे अवैधरित्या विक्री करीता आणलेली विदेशी दारू केली जप्त,वाहनासह एकुन 8,16,600/- रू चा मुद्देमाल केली जप्त…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रभारी यांना अवैध धंदे यावर विशेष लक्ष केंद्रीत करायला सांगितले होते त्याच्याअनुषंगाने  दिनांक 18 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलिस पथक यांनी वर्धा शहर,रामनगर,सावंगी मेघे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहीती प्राप्त झाली अक ईसम दारुचा साठा घेऊ सिंदी मेघे वर्धा  थुल लेआउट सिंदी मेघे या मार्गाने जानार आहे त्यावरुन त्या रस्त्यावर पाळत ठेऊन येणाऱ्या गाडीवर छापा टाकला असता मौक्यावर

1 ) प्रदीप देविदासजी काबंळे वय 37 वर्ष रा. वार्ड न. 2 थुल लेआउट, सिंदी मेघे, वर्धा जि. वर्धा

2) कुनाल उर्फ आदी विनायक मांदाडे वय 29 वर्ष रा. वार्ड न. 2 थुल लेआउट, सिंदी मेघे, वर्धा जि. वर्धा यांचे ताब्यातुन एक जुनी
वापरती पाढऱ्या रंगाची चारचाकी पांढऱ्या रंगाची मारूती सुजुकी कंपनीची स्वीफ्ट वाहन क्र एम. एच. 32 बी. 0958 त्या वाहनाचे डिक्की मध्ये व मधील सिटवर वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी व बियर दारूने भरलेल्या दारूच्या एकुन 10 पेटया असा एकुन वाहनासह  किंमत 8,16,600 /- रू. चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्त करण्यात आला
सदर आरोपींना विदेशी दारूचा माल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की सदर विदेशी दारूचा माल हा यवतमाळ जिल्हयातील कंळब येथील एम. पी. ट्रेडर्स
नावाचे वाईन शॉप मधुन आणला आहे सदर वाईन शॉपचे मालक मनिष जयस्वाल रा. कळंब जि. यवतमाळ हे आहे. असे सांगीतल्याने एम. पी. ट्रेडर्स वाईन शॉप चे मालक यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपींना दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य म. दा. का. कलम 82 प्रमाणे होत असल्याने सदर गुन्हयात बार मालक यास आरोपी बनविण्यात आले आहे.
यावरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे आरोपीविरूध्द अप क्र 140 / 2024 कलम 65 अ ई, 77 अ, 82, 83, म. दा. का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील
पोलिस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस
अधिक्षक डॅा सागर कवडे, याचे विशेष मार्गदर्शन प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा, रोशन पंडीत यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाचे पो. हवा. अमर लाखे, पो.शि, मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.