Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

69


पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…




पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

नाशिक – शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलीस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यातील त्यांच्या कॅबिनमध्ये नजन यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. त्यामुळे यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे असलेले नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.

आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ते त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अंबड पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर अशोक नजन यांनी स्वतःवर का गोळी झाडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सविस्तर बातमी लवकरच…





Leave A Reply

Your email address will not be published.