Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मदत करण्याच्या बहाण्याने बॅगमधील दागिणे लंपास करणारे टोळीस हरीयाणा येथुन घेतले ताब्यात….

7

वयोव्रुध्द दामपत्यास मदतीच्या बहान्याने त्यांचेकडील दागिणे लुटणारे, आरोपीला हरियाणा मधुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

अकोला (प्रतिनिधी) – बसमध्ये प्रवाशाला लुटून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास १८ लाख रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हरियाणा मधुन मुद्देमालासह शिताफीने अटक करण्यात स्थागुशा अकोला यांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी सतीश बाबुराव गंगाळे (वय ६० वर्षे), रा.उमरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार (दि.१०फेब्रुवारी) रोजी फिर्यादी सतीश बाबुराव गंगाळे (वय ६० वर्षे), रा.उमरी हे त्यांचे पत्नीसह बसने औरंगाबादला जात असताना वाशिम बायपास दरम्यान त्यांचेकडील लाखो रूपयांचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम २ लाख ८० हजार रूपये चोरी झाले वरून पोलिस स्टेशन. सिव्हिल लाईन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात स्था.गु.शा. अकोला येथील पथक (दि.१३फेब्रुवारी) रोजी आरोपीचा शोध घेणे कामी हरियाणा रोहतक येथे रवाना करण्यात आले. संशयीत आरोपी हे रोहतक, जि.हिस्सार या भागातील हरियाणा राज्यातील असल्याचे समजले होते परंतु सदर भागात किसान आंदोलन चालु असल्याने रस्ते व मोबाईल नेटवर्क पुर्णपणे बंद असल्याने तपास पथकाला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे स्थानिक पोलिसांची मदत मिळण्यास अडचण झाल्याने तपास पथकाला तपास करणे आव्हानात्मक होते.

गोपनीय माहिती व खबरीचे नेटवर्क वरून सदर पथकाला ८ दिवसाच्या अथक परिश्रमा नंतर संशयीत आरोपी अमीत पिता बिजेंद्र याला ताब्यात घेवुन सदर गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल १) एक सोन्याचा नेकलेस, ०४ सोन्याच्या अंगठया, सोन्याचे चैन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणी हार व इतर सोन्याचे दागीने व २) काळया मन्याची पोत सोन्याचे पेडॉल सह असे एकुण २७५ ग्रॅम सोन्याचे दागीने व नगदी १.५० लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयांचा मुद्देमाल रोहतक राज्य हरियाणा येथुन जप्त करण्यात आला.

नमुद आरोपी हे लक्झरी बस स्टॅण्ड, बस स्थानक येथे वयस्कर लोकांवर पाळत ठेऊन त्यांचे सुटकेस / बॅग उचलण्यास मदतीचा बहाणा करून सुटकेस / बॅग मधील रोख रक्कम, सोन्याचे दागीने चोरी करीत होते. या गुन्हयात आरोपीची ओळख पटविण्यासाठी बस चालक, वाहक, ऑटो चालक लक्झरी बस चालक इत्यादि लोकांची विचारपूस करून संशयीत आरोपीची माहिती तांत्रीक पध्दतीने जमा करून पाठपुरावा केला.

याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,(दि.१० फेब्रुवारी) रोजी फिर्यादी सतिश बापुराव गंगाळे, (वय ६० वर्षे), रा.गणेश नगर, उमरी, अकोला हे त्यांचे पत्नी सह नातेवाईकाचे साखरपुडयाचे कार्यक्रमात बसने औरंगाबाद येथे जात असतांना बस स्टॅण्ड वरून दोघे बस मध्ये आपल्या सोबत असलेल्या बॅग व सुटकेस घेवुन बसच्या कॅरीवर ठेवण्यासाठी उठले असता त्यांचे पाठीमागे बसलेला अज्ञात मुलगा फिर्यादीस म्हणला कि, थांबा काका मी ठेवुन देतो दोन्ही थैल्या व सुटकेस ठेवल्यानंतर सदरचा अज्ञात मुलगा हिंदी भाषीक असल्याने त्याने म्हटले कि, यह बस बासिम जाती नही क्या? हम को बासिम जाना है ? असे घाई गडबड करून बस वाहक यास विचारून वाशिम बायपास अकोला येथे उतरला. त्यानंतर फिर्यादी याने सुटकेस ची पाहणी केली असता सुटकेस ही उघडी केलेली दिसली. त्यामध्ये फिर्यादी यांचे पत्नीचे सोन्याचे दागीने व नगदी २,८०,०००/ रु. चोरून नेले असे फिर्यादी यांचे लक्षात आल्याने त्यांनी पो.स्टे. सिव्हील लाईन येथे रिपोर्ट दिल्याने पो.स्टे. ला अप क. ११६/२०२४ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे प्रभारी अधिकारी पो.नि. शंकर शेळके यांना स्थागुशा. अकोला येथील पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांनी स्थानीक गुन्हे शाखा येथील पोउपनि. गोपाल जाधव, पोहवा. खुशाल नेमाडे, नापोशि वसिमोद्दीन, पोशि मोहम्मद आमीर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून आदेश दिले.

त्याप्रमाणे पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचा तांत्रीक व गोपनीय माहीतीचे आधारे अथक परिश्रम करून आरोपींची ओळख पटविण्यात यशस्वी झाले. सदर गुन्हयामध्ये हरियाणा येथील रोहतक येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने स्था. गु. शा. अकोला येथील एक पथक हरियाणा येथे रवाना झाले होते. तेथे ०८ दिवस अथक परिश्रम करून तसेच सदरचा भाग दिल्ली हरियाणा पंजाब सिमावर्ती भाग असल्याने तेथे सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे तेथील रस्ते व मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले होते. अश्या परिस्थीत तेथील स्थानिक खबरी व गोपनीय माहितीदार यांच्या मदतीने यातील आरोपी नामे अमीत पिता बिजेंद्र वय ३४ वर्ष, रा. रूरकी, ता. जि. रोहतक, राज्य हरियाणा यास ताब्यात घेवुन त्याचे जवळून फिर्यादीत नमुद असल्याप्रमाणे १) एक सोन्याचा नेकलेस, ०४ सोन्याच्या अंगठया, सोन्याचे चैन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणी हार व इतर सोन्याचे दागीने व २) काळया मन्याची पोत सोन्याचे पेडॉल सह असे एकुण २७५ ग्रॅम सोन्याचे दागीने अंदाजे किमंत १६ लाख ५० हजार रूपये, व नगदी १.५० लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयर्याचा मुद्देमाल हा रोहतक हरियाणा येथे जप्त करण्यात आले. आरोपी यास पुढील कायदेशीर कारवाई कामी पोस्टे. सिव्हील लाईन याचे ताब्यात देण्यात येत आहे. सदर गुन्हयात ईतर आरोपीचा सहभाग आहे का ? याबाबत तपास सुरू आहे.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला सह.पोनि. कैलास भगत, पोउपनि. गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार पोहवा खुशाल नेमाडे, नापोशि. वसिमोद्दीन, पोशि मोहम्मद आमीर यांनी मुख्य कामगिरी करून प्राथमिक तपासात पुढील अंमलदार यांनी मदत केली दशरथ बोरकर, गणेश पांडे, फिरोज खान, उमेश पराये, भास्कर धोत्रे, प्रमोद डोईफोडे, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, गोकुळ चव्हान, अब्दुल माजीद, विशाल मोरे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, स्वप्नील खेडकर, एजाज, लिलाधर खंडारे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे, सतिश पवार, अमोल दिपके, राहुल गायकवाड, चालक प्रशांत कमलाकर तसेच सायबर सेल चे अंमलदार आशिष आमले यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.