Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डॅा राठी खुनी हल्ला प्रकरणातील आरोपी पंचवटी पोलिसांचे ताब्यात…

6

सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणारा आरोपीस २४ तासाचे आत पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय – ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आलेला इसम राजेंद्र चंद्रकांत मोरे याने आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातुन कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून पळुन गेला होता.
सदर संशयिता विरूध्द डॉ. रिना कैलास राठी यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे गुन्हा. रजि. नं. १०९/२०२४ भा.दं.वि. कलम ३०७,३४ सह आर्म ॲक्ट ४ / २५, मुपोका १३५ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
सदर संवेदनशील गुन्हयाचे अनुषंगाने संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त परिमंडळ- २, नितीन जाधव, सहा. पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील संशयित आरोपींचा शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.
त्याचप्रमाणे जखमी डॉ. कैलास राठी यांची अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे भेट घेवुन, त्यांची पत्नी डॉ. राठी व वैद्यकिय अधिकारी, अपोली हॉस्पिटल, नाशिक यांचेशी प्रकृती बाबत विचारपुस केली.
त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील संशयित आरोपीतांचा शोध घेण्याकरीता पंचवटी पोलिस स्टेशन मधील पथके रवाना करण्यात आली होती. संशयित आरोपी राजेंद्र चंद्रकांत मोरे, वय ३७ वर्षे हा जुना आडगांव नाका, संतोष टि पॉईट परिसरात त्याचे भावास भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोहवा  शेखर फारताळे यांना प्राप्त झाल्याने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे
मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शना खाली सदर परिसरात सपोनि. विलास पडोळकर,शेखर फारताळे,पोहवा संतोष जाधव,राजेश सोळसे,नापोशि यतीन पवार,पोशि श्रीकांत कर्पे,युवराज गायकवाड या पोलीस पथकाने सापळा रचुन संशयित आरोपीतास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पंचवटी पोलिस ठाणे येथे आणुन सदर गुन्हयात अटक केली आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत,पोलिस उपायुक्त परि -२, नितीन जाधव, सहा. पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग, वपोनि. मधुकर कड, पोनि (गुन्हे). नंदन बगाडे, पंचवटी पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाणेकडील सपोनि. विलास
पडोळकर,मिथुन परदेशी, अशोक काकड, पोहवा शेखर फारताळे, सागर कुलकर्णी, संतोष जाधव,राजेश सोळसे, नापोना  यतीन पवार,पोशि श्रीकांत कर्पे,युवराज गायकवाड, व गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अशांनी पार पाडली आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि. विलास पडोळकर हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.