Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आझादनगर पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक…
धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने आझाद नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक करून एक होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल, एक हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल, एक्स स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल आणि एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अशा एकूण १ लाख ५० हजार रु. किमतीच्या मोटारसायकली ह्या जप्त केल्या आहेत.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.२५फेब्रुवारी) रोजी धुळे शहरात शब्बे बारात बंदोबस्त निमित्ताने आझादनगर पोलीस स्टेशन येथील गोल चौकी येथे नेमणुकीस असलेले पोहवा मनोज बागुल,अविनाश लोंखडे,योगेश शिरसाठ, नापोशि गौतम सपकाळे हे सर्व खाजगी मोटारसायकलने पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना ०८.४५ वाजेचे सुमारास पारोळा रोड कॉटन मार्केटच्या पुढे नक्षत्र लॉन्स जवळ असतांना पारोळा चौफुलीकडुन एक इसम हा होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेल असलेली काळया रंगाची विना क्रमांकाच्या मोटारसायकल वर धुळे शहरात येत असतांना दिसल्याने सदर इसमास थांबवुन त्यास तो चालवित असलेल्या विना क्रमांकाच्या मो.सा. बाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने सदर इसमास पोलिस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव
एजाज अहमद रियाज अहमद (वय ३४ वर्षे), रा.घर नं.७९,पवारवाडी दातार नगर, अजमी बेकरी जवळ मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक
असे सांगितले. त्यास त्याच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल संदर्भात अधिक विचारपुस व कागदपत्राची मागणी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देवुन त्याचे ताब्यातील मोटारसायकल च्या मालकी हक्काबाबतचे कागदपत्रे नसलेबाबत सांगितले.त्या नंतर सदर इसमाबाबत पवारवाडी पोलिस स्टेशन मालेगाव ता. मालेगाव, जि.नाशिक येथे संपर्क करुन अधिक माहिती घेतली असता सदर इसम हा पवारवाडी पोलिस स्टेशन मालेगाव येथील कुख्यात गुन्हेगार असुन त्याचेवर आझादनगर पोलिस स्टेशन मालेगाव येथे गुरनं. २१८/२०२३ भादवि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले..सदर इसमाच्या ताब्यात मिळुन आलेली एक होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेल असलेली काळया रंगाची मो.सा. क्र. MH १८ BK २४५२ अशी असुन सदर मोटारसायकल चोरी झालेबाबत आझाद नगर पोलिस स्टेशन येथे गुरनं. ३१२/२०२३ भादवि. कलम ३७९ प्रमाणे (दि.२७नोव्हेंबर २०२३) रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीतास विश्वासात घेतले असता त्याने विविध ठिकाणी मोटार सायकल चोरी केल्याबाबत कबुली देऊन सदर आरोपीकडुन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीतास आझादनगर पोलिस स्टेशन धुळे गुरनं. ३१२/२०२३ भादवि कलम ३७९ मध्ये अटक करण्यात आली असुन आरोपीतास मा. न्यायालयाने दि.२८फेब्रुवारी पावेतो पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केलेला आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर विविध पोलिस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हा पोलिस कस्टडीत असल्याने अजुन मोटार सायकल चोरी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलिस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे आझाद नगर पोस्टेचे पोनि. निवृत्ती पवार, सपोनि. उमेश बोरसे,पोउपनि समाधान सुरवाडे, परि.पोउपनि रविंद्र बागुल व त्यांचे पथकातील सफौ प्रकाश माळी, पोहवा योगेश शिरसाठ,संदीप कढरे,गौतम सपकाळे,शांतीलाल सोनवणे, मनोज बागुल, अविनाश लोखंडे,साहेबराव भदाने,योगेश शिंदे, पोशि अनिल शिंपी,अजहर शेख,सचिन जगताप,पंकज जोंधळे, मक्सुद पठाण यांनी सदरची कारवाई केली आहे,