Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बैलगाडीच्या सहाय्याने तेलंगणा राज्यातुन होणार्या दारु तस्करांच्या आवळल्या मुसक्या,४ लाखाच्या विदेशी दारुसह तस्कर संदीप स्थागुशा पथकाच्या ताब्यात….

7


बैलगाडीच्या सहाय्याने तेलंगणा राज्यातुन होणार्या दारु तस्करांच्या आवळल्या मुसक्या,४ लाखाच्या विदेशी दारुसह तस्कर संदीप स्थागुशा पथकाच्या ताब्यात….




बैलगाडीवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,देशा विदेशी दारुसह 4,22,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त….

गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असेकी,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे  पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलगाडीचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे दिसुन येते.
दि.(27) रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले.
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणा­या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणा­या तीन बैलगाड्या व पोलिसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलगाड्यामधे मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाईदरम्यान पोलिस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाड्या व ईतर 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलिस स्टेशन बामणी येथे आरोपी संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी  एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक  उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलिस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चानापोशि दिपक लोणारे यांनी केली





Leave A Reply

Your email address will not be published.