Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नांदगावपेठ जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी कोयता गॅंगचे सदस्यांना युनीट १ पुणे येथुन घेतले ताब्यात…

11

नांदगाव पेठ जबरी चोरी प्रकरणी सहभाग असलेले कुख्यात कोयता गँगचे २  सदस्यांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने पुणे येथुन घेतले ताब्यात,  त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले शस्त्र(कोयते),मोबाईल व ईर्टिगा कार असा एकुण ८,२२,४००/- रू मुद्देमाल जप्त……

कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन, नादगांव पेठ, अमरावती शहर येथे फिर्यादी नामे शुभम गजानन पांडे वय ३० वर्ष रा. शिवनगांव फत्तेपुर अमरावती यांनी दिनांक २९/०२/२२४ रोजी फिर्याद दिली की, ते व त्याचे सोबत निरंजय संजय डिवे हे भारत तसरे यांचे भारत पेट्रोल पंप शिवनगांव येथे नाईट डयुटी करीता असतांना अंदाजे रात्री ११:३५ वाजता चे दरम्यान ४ इसम एक काळया रंगाची स्ल्पेन्डर व लाल रंगाची पल्सर वर पेट्रोल भरण्यास आले व त्यांनी पेट्रोल भरून ५००/- रु  दिले त्यानतंर फिर्यादी यांनी पैसे परत करते वेळी फिर्यादी यांच्या हातातील ७९००/- रूपये हिसकावुन जबरीने शस्त्रांचा धाक दाखवुन व कोयत्याने फिर्यादी यास गंभीर जखमी करून पळुन गेले असे फिर्यादी च्या तक्रारी वरून पोलिस स्टेशन नादगांव पेठ येथे अपराध क्रमांक ७१ / २०२४ कलम ३९२, ३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी  यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हेशाखा यांना गुन्हा उघडकिस आणण्याकरीता व आरोपीस अटक करण्याबाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक १ व २ यांनी सदर गुन्हयाचा समातंर तपास करून गुप्त बातमीदार नेमुण तसेच विविध ठिकाणी असलेल्या सी.सी.टी.
व्ही चा तांत्रीक अभ्यास करून खात्री लायक माहीती प्राप्त करून गुन्हेशाखा युनिट क्र. १ यांनी सदर गुन्हयातील ३ आरोपींना यापुर्वीच अटक केली होती. परंतु सदर गुन्हयातील मुख्य आरोपी हे पुणे येथील कोयता गँग चे सदस्य असल्याचे व सदर आरोपी हे पुणे येथुन अमरावती येथे ईर्टिगा कार ने येवुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने  पोलिस आयुक्त  यांनी गुन्हेशाखा युनिट २ चे विशेष पथकास पुणे शहर येथे तात्काळ रवाना केले पथकाने अमरावती येथुन पुणे शहरापर्यंतचा पाठलाग करून व पुणे शहरात गेल्या नंतर अतिशय कौशल्यपुर्णरित्या माहीती काढुन सर्वात आधी ग्राम येवत जि. पुणे येथुन एका आरोपीस ताब्यात घेवून त्याचे कडुन विचारपुस करून लगेच दुस-या आरोपीला ग्राम मांजरी, हडपसर, जि. पुणे येथुन ताब्यात घेतले त्यानतंर आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली शस्त्रे हस्तगत केले तसेच गुन्हयात वापरलेली ईर्टिगा कारही हस्तगत केली
गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ अमरावती शहर चे विशेष पथकाने सतत २० तास प्रवास करून व ४ तास पुणे शहर येथे सतत विशेष मोहीम राबवुन आरोपी नामे

१) प्रतिक विजय माने वय २३ वर्ष रा. येवत ता. दौंड जि. पुणे,

२)विकास गोविंद शेंडगे वय २४ वर्ष रा. ग्राम मांजरी, हडपसर जि. पुणे

यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन गुन्हयात वापरलेली २ शस्त्रे (कोयते) कि. २४००/- रूपये, २ मोबाईल कि २०,०००/- रूपये व आरोपींनी गुन्हयात वापरलेली ईर्टिगा कार कि. ८,००,०००/- रूपये असा एकुण ८, २२,४००/- रूपये चा मुद्देमाल हस्तगत करून अतिशय उल्लेखनीय कामगीरी केली.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हेशाखा  कल्पना बारावकर, पोलिस उपायुक्त परीमंडळ – १  सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव गुन्हे शाखा युनीट १, अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, मनिष वाकोडे, अनिकेत कासार, पोलिस अंमलदार दिपक सुंदरकर, गजानन देवले, योगेश पवार, निलेश वंजारी, चेतन कराडे, संदिप खंडारे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.