Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अट्टल घरफोडया लखन यास स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा येथुन ठोकल्या बेड्य,घरफोडीचे दोन गुन्हे केले उघड…
अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०१/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीतील राम मंदिर परिसर, चांदुर रेल्वे येथील रहिवासी फिर्यादी आकाश मारोती खंडारे हे परिवारासह लग्नसमारंभाकरीता गेले असता, त्यांचे राहते बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन बेडरुमचे अलमारीमधुन नगदी ७०,०००/- रु, सोन्या-चांदीचे दागिने, प्रोजेक्टर व कॅमेरा असा एकुण १,२१,०००/- रु चा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली असल्याचे दिनांक ०२/०३/२०२४ रोजी निदर्शनास आले वरुन फिर्यादी यांचे तक्रारीवरुन पो स्टे येथे अप क्र.१३३/२४, कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान नरेंद्र रंगरावजी कडु, रा. राधानगर, चांदुर रेल्वे यांचे येथे देखील बंद घराचे कुलुप तोडुन चोरीचा प्रयत्न झाल्याने त्यांचे
तक्रारीवरुन पो स्टे येथे अप क्र. १३९/२४, कलम ४५४, ४५७, ३८०, ५११ भादंवि चा गुन्हा दाखल करण्यात आला होता
जिल्हयातील घरफोडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिस अधिक्षक यांनी गुन्हे उघडकीस आणनेसाठीचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अज्ञात
आरोपीचा शोध घेवुन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी प्रयत्नरत असतांना पोउपनि सागर हटवार यांचे पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, ग्राम गोजी, जि. वर्धा येथील अर्पण पाटील हा रेकॉर्डवरील घरफोडया असुन त्यानेच हे घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत. त्यानुसार स्थागुशा पथकाने अर्पण ऊर्फ लखन राहुल पाटील, वय ३६, रा. ग्राम गोजी, ता. जि. वर्धा गोजी येथुन शिताफीने ताब्यात घेवुन कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता, त्याने नमुद दोन्ही घर फोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली वरुन त्याचे ताब्यातुन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी नगदी ४०,०००/- रु व घरफोडीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असुन पो स्टे चांदुर रेल्वे येथे दाखल अप क्र. १३३/२४, कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि आणि अप क्र. १३९/२४, कलम ४५४, ४५७, ३८०, ५११ भादंवि याप्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशिर कारवाई साठी पो स्टे चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोहवा अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, नापोशि सचिन मसांगे, चालक पोहवा संजय प्रधान आणि पो स्टे सायबर यांचे पथकाने पार पाडली.