Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर चिखली पोलिसांच्या ताब्यात, 31,50,000/- रु च्या गांजासह एकुण 51,50,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…
चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 16/03/2024 रोजी पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांना गोपनिय माहीती मिळाली की,खामगाव ते जालना महामार्गाने UP- 21 CN 4035 क्रमांकाच्या कंटेनर मधुन बेकायदेशीरपणे गांजाची वाहतुक होणार आहे. अशा माहीतीवरुन दुपारी 03.00 वाजताचे सुमारास जालना रोडवर भानखेड शिवारात, हॉटेल लालपरी जवळ नाकाबंदी करुन येथे पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण,पोलिस अंमलदार विजय किटे, चंद्रशेखर मुरडकर, गजानन काकड, सुनिल राजपुत, सुरज राजपुत, जिल्हा वाहतुक शाखेचे निलेश शिंगणे, संतोष चिडे यांचे पथक व नायब तहसिलदार श्री संतोष मुढे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक श्री राहुल रोकडे, फोटाग्राफर, सरकारी पंच तसेच अंमली पदार्थ शोध पथकातील श्वान एंजल सह सापळा रचण्यात आला. मिळालेल्या गोपनिय माहीतीप्रमाणे चिखली कडुन एक लाल रंगाचा UP- 21 CN 4035 क्रमांकाचा कंटेनर दिसताच त्यास थांबवुन पंचासमक्ष कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाचे चिकटपट्टीने पॅकींग केलेले प्रत्येकी 5 किलो वजनाचे एकुण 42 पाकीटे वजन 210 किलो ज्याची किंमत 31,50,000/- असलेले मिळुन आले. सदर मिळुन आलेल्या पाकीटातील पदार्थाची पाहणी केली असता त्यामध्ये उग्र वासाचा गांजासदृश्य पदार्थ दिसुन आला वरुन सदर पदार्थाचा बुलडाणा पोलिस दलाचे श्वान पथकाचे
संजय चाफले यांनी श्वान एंजल यास वास दिला असता श्वानाने सदर पदार्थ हे अंमली पदार्थ असल्याबाबत संकेत दिले. पोलिसांची व पंचांची खात्री होताच सदर कंटेनर चालक चंदरपाल जिवाराम रा. शांतीविहार बरेली उत्तरप्रदेश यास ताब्यात घेऊन कंटेनर व गांजाची पाकीटे असा एकुण 51,50,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला आहे. नमुद आरोपी याचेविरुध्द अप क्रमांक 214/2024 कलम 20 (ब) अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात,उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार
चिखली यांचे नेतृत्त्वात सपोनि संजय मातोंडकर, पोउपनि शरद भागवतकर, पोउपनि नितीनसिंह चौहाण,पोलिस अंमलदार विजय किटे, चंद्रशेखर मुरडकर, गजानन काकड, सुनिल राजपुत, सुरज राजपुत, जिल्हा वाहतुक शाखेचे पोनि रवी राठोड यांचे पथकातील निलेश शिंगणे, संतोष चिडे, श्वान पथकातील संजय चाफले यांचे पथकाने केली आहे. सदर गांजा हा आरोपी याने कोठुन आणला, तो कोठे घेऊन चालला होता याबाबत अधिक तपास चिखली पोलिस करीत आहेत.