Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोबाईल व दुचाकी चोरटे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात….

9

दुचाकीवरुन भरधाव वेगाने येवुन मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना व दुचाकी चोरट्यांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद….

पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या तसेच स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते. दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत स्वारगेट तसेच लोकांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेवुन जाण्याच्या घटना घडत होत्या त्यावरुन स्वारगेट पोलिस निरीक्षक यांनी स्वतः तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांना आदेशीत केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा.पोलिस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दिपक खेंदाड,संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेख व फिरोज शेख यांनी सदर परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलींग करीत असताना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे
राजेन्द्र परमेश्वर कदम वय २४ वर्षे धंदा वाळु सीमेंट सप्लायर्स रा. लक्ष्मीनगर अंबेडकर वसाहत पर्वती पुणे यास अटक करुन त्याचेकडुन तपासादरम्यान ०२ दुचाकी तर एका विधीसंघर्षीत बालकांकडुन ०१ दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे
तसेच दुचाकी वरुन भरधाव वेगाने येवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकावुन घेवुन जाणाऱ्या आरोपी नामे १) साद शेरअली शेख वय २२ वर्षे रा. ९३२, सदानंदनगर सोमवार पेठ पुणे २) उदय सुनिल जाधव वय २२ वर्षे रा. ९३२, सदानंदनगर सोमवार पेठ पुणे यांना अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात त्यांनी चोरी केलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

वर नमुद आरोपींकडुन दाखल गुन्ह्यांमधील एकुण ०२ लाख १० हजार रुपये किंमतीची ०४ दुचाकी वाहने व एक मोबाईल फोन जप्त करुन एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत. ते पुढीलप्रमाणे
१) स्वारगेट पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ८४/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२, ३४

२) स्वारगेट पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६०/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९

३) स्वारगेट पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५३/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९
४) स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२४ भा.दं.वि. कलम ३७९
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार,अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील ,पोलिस उपायुक्त परी.२ स्मार्तना पाटील,,सहा.पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक.दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे)  गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक
अशोक येवले, पोलिस अंमलदार सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दिपक खेंदाड,  शिवा गायकवाड,  फिरोज शेख,संदीप घुले,रमेश चव्हाण,प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.