Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धारदार तलवार बाळगणारा इसमास गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने केले जेरबंद….

8


धारदार तलवार बाळगणारा  इसमास गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने केले जेरबंद….




धारदार तलवार बाळगणारा  इसमास गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने केले जेरबंद….

नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
नाशिक लोकसभा – २०२४, आदर्श आचार संहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर  संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असतांना आज दि. १८/०३/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ कडील पोहवा प्रविण वाघमारे यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की,
आडगांव मेडीकल कॉलेज जवळ, वसंत दादा नगर येथे एक इसम हातात धारदार तलवार घेवुन फिरत असल्याची बातमी मिळाली सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट – १ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक  मधुकर कड यांना देवुन त्यांनी पो. हवा धंनजय शिंदे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमुद पथकाने आडगांव मेडीकल कॉलेज जवळ, वसंत दादा नगर जवळ सापळा लावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे इसम नामे रोहीत नवनाथ राऊत रा.
मेडीकल कॉलेज हॉस्पीटल समोर, राउत मळा, आडगांव नाशिक यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.त्याचे कब्जातुन १,०००/- रु. किंमतीची एक स्टिलच्या धातुची तलवार हस्तगत करण्यात आली आहे.सदर इसमा विरुध्द आडगाव पोलिस ठाणे येथे सरकारवाडा तर्फे फिर्याद देवुन गुन्हा दाखल केला असुन आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कारवाई कामी आडगाव पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पो. हवा धंनजय शिंदे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे चालक समाधान पवार यांनी संयुक्त रित्या केलेली आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.