Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चंद्रपुर LCB ने पकडला राजुरा येथे सुगंधीत तंबाखुचा साठा…

9

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला राजुरा पोलिस स्टेशन हद्दीत  सुंगधीत तंबाखुचा साठा जप्त…

राजुरा(चंद्रपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होशी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्रपुर मुमक्का सुदर्शन यांनी
दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑलआउट मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पथक यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन राजुरा अंर्तगत मस्जिद वार्ड येथे राहानारा इसम नामे अशोक ठक्कर हा आपल्या चारचाकी वॅगनार क MH-34-BR-1623.मध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखुचा साठा बाळगुन ते विकीकरीता आपले कार मध्ये ठेवुन आहे.त्यावेळी सदर ठिकाणी जावुन अतिशय गोपनीय माहिती काडुन कार कं MH-34-BR-1623 चा व सदर आरोपीचा शोध घेवुन दोन पंचासमक्ष कारची पाहणी केली असता सदर कार मध्ये खालील प्रमाणे अवैधरित्या सुगंधी तंबाकुचा साठा मिळुन आला.
1) पाच पांढ-या रंगाच्या प्लास्टिक चुंगडीमध्ये मजा तंबाकु 108 प्रत्येक चुंगडीमध्ये 200 ग्रम वजनाचे 40 डब्बे असे एकुण पाच चुगडी मध्ये 200 डब्बे प्रत्येकी नग 934/- रू प्रमाणे किंमत 1,86,800 /- रू.
2 ) सात पांढ-या रंगाच्या पॅल्स्टीक चुंगडीमध्ये इगल हुक्का शिशा तंबाकु प्रत्येक चुंगडी मध्ये 200 ग्राम वजनाचे 44 पाऊच असे एकुण 308 पाऊच प्रत्येकी पाऊच प्रती नग 310 /- रू प्रमाणे किंमत 95480/- रू.
3) तीन पांढ-या रंगाच्या पॅस्टीक चुंगडीमध्ये इगल हुक्का शिशा तंबाकु प्रत्येक चुंगडीमध्ये 40 ग्राम वजनाचे 110 पाऊच असे एकुण 330 पाऊच प्रत्येकी पाऊच प्रती नग 64 रू प्रमाणे किंमत 21,120/- रू.
4) चार पिवळया रंगाचे पॅल्स्टीक चुंगडीमध्ये होला हुक्का शिशा तंबाकु प्रत्येक चुंगडीमध्ये 200 ग्राम वजनाचे 50 पाऊच असे एकुण 200 पाऊच प्रत्येकी पाऊच प्रती नग 164 रू प्रमाणे किंमत 32,800/-रु
5) एक सिल्वर रंगाची सुझुकी वॅगनर कार जिच कं MH-34-BR-1623 किंमत 5,00,000/- रू
असा एकुण 8,36,200 /- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर मुददेमाल व आरोपी यांना ताब्यात घेवुन त्याचे विरूध्द पो.स्टे राजुरा येथे अप क्रं 0214 / 2024 कलम 328, 188, 272,273
भादवी, सह कलम 30(2), 26 (2), (अ),3,4,59(1) अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये दाखल करण्यात आला असुन. तसेच सदर मुद्देमाल  व आरोपीस पुढील कार्यवाहीकामी राजुरा पो.स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलिस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलिस अधिक्षक, रिना जनबंधु  यांचे मार्गदर्शनात मा. पोलिस निरीक्षक, महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, सपोनि विकास गायकवाड, पो.हवा अनुप डांगे व पोहवा मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.