Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रंगमंचमी निमित्त रंगोत्सवात पुण्यात रंगले मराठ

7

पुणे,दि.३१ : – पुण्यात रंगमंचमी निमित्त आज दि.३१ रविवारी  मराठी सिनेमा आणि नाट्य सृष्टीतील कलावंत रंगोत्सवात रंगताना दिसले. निमित्त होते मेघराज राजेभोसले मित्र परिवार यांच्या वतीने शुभारंभ लॉन्स येथे आयोजित ‘रंगोत्सव कलाकारांचा २०२४’ या कार्यक्रमाचे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या वतीने पुण्यातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेते रमेश परदेशी, अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेते आरोह वेलणकर, ऍड मंदार जोशी,अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे,कुणाल निंबाळकर,अभिनेते अभिजीत बीचुकले,संदीप पाटील, त्यागराज खाडीलकर तसेच १५०० मराठी सिनेमा,नाट्य, नृत्य, संगीत या क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते सहभागी झाले होते.

‘रंगोत्सव कलाकारांचा २०२४’ च्या निमित्ताने रंगाच्या उधळणी बरोबरच कलावंतांनी लाईव्ह डीजे आणि लाईव्ह ओर्केस्ट्रा  यांच्या साथीने विविध प्रकारच्या फनी गेम्सचा आनंद लुटला. यावेळी मेघराज राजेभोसले मित्र परिवाराचे सदस्य अण्णा गुंजाळ यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.