Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केला गुन्हा….

28


मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केला गुन्हा….






मोटारसायकल चोरट्यास  वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा….

वर्धा(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 7/02/24 रोजी यातील फिर्यादी शुभम शशिकांत राठोड व 29 वर्ष राहणार डयशवंत नगर वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तोंडी रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल काळ्या रंगाची जिचा क्रमांक एम एच 29 ए झेड 4634 किंमत 40,000/- रु ही दिनांक 7/2/ 2024 रोजी दुपारी 12:15 वाजता फिर्यादी यांनी त्यांचे घरासमोर हँडल लॉक न करता उभी ठेवून ते जेवण करणे करता गेले व अर्ध्या तासाने बाहेर आले असता त्यांना त्यांची वर नमूद मोटरसायकल दिसून आली नाही ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोस्ट वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला, पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक हे वर्धा शहरात चोरी गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमीदार यांचेकडून गुप्त माहिती मिळाली की एक इसम बस स्टॅन्ड वर्धा परिसरात काळा रंगाची स्प्लेंडर गाडी विकणे करिता ग्राहक शोधत आहे आहे पोलिसांनी सापळा रचून ईसमास ताब्यात घेऊन त्यास सदर गाडी संदर्भात विचारले असता व त्यास त्याचे नाव विचारले असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता त्याची कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मनोज सुरेशराव सयाम रा. कान्हापूर  ता सेलू जिल्हा वर्धा असे सांगितले व सदरची मोटारसायकल त्यानेच चोरी केल्याचे सांगितले म्हुनन त्यास ताब्यातुन मोटारसायकल हस्तगत करुन त्यास सदर गुन्ह्यांत अटक करुन सदरचा गुन्हा उघडकिस आणला

सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर,पोलिस निरीक्षक वर्धा शहर पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार पंकज भरणे, प्रशांत वंजारी, पोलिस शिपाई श्रावण पवार, उज्वल घंगारे सर्व पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.



DB Squad, Detected Motorcycle theft, Wardha, Wardha city PS



Leave A Reply

Your email address will not be published.