Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुख्यात गुंड लाल्या याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…..

10


महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा

कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर यास  MPDA कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील पंचशिल नगर, वाशिम बायपास, जुने शहर येथे राहणारा कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर वय ३४ वर्ष, रा. पंचशिल नगर, वाशिम बायपास, जुने शहर, अकोला याचे वर यापूर्वी
खूनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, एखाद्या व्यक्तीस मृत्यु किंवा जबर दुखापत याची भिती घालुन बलाद्ग्रहण करणे, दुखापत, हमला किंवा गैर निरोध करण्याची पूर्व तयार करून गृह अतिक्रमण करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचविणे,
लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, बलाद्ग्रहण करणे, नुकसान करून आगळीक करणे, प्राण घातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे शांतता भंग घडवुन आण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्ल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक, एम.पि.डी.ए. अन्वये कार्यवाही, करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. नुकतेच त्याने जेल मध्ये स्थानबध्द असलेला कुख्यात गुंड गजानन कांबळे यास अकोला जिल्हा कारागृह येथे भेटण्याकरीता गेला असता तेथे त्याने तुरुंग अधिक्षक जिल्हा कारागृह अकोला यांना धक्का बुक्की करून अश्लील शिवीगाळ केली होती.

त्याची गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी,श्री अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची
पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १६/०४/२०२४ रोजी पारीत केला.
‘मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर यास सदरचे आदेश जिल्हा कारागृह वाशिम येथे दिनांक १६/०४/२०२४ रोजी तामील करून त्यास जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.

सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता.पोलिस अधीक्षक. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे, पोहवा ज्ञानेश्वर सैरिसे,पोशि उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पो.स्टे. सिटी कोतवाली येथील पोलिस निरीक्षक सुनिल वायदंडे, सपोनि अंधारे, पोउपनि माजीद पठाण, पोलिस अमंलदार दिनेश शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे  असा इशारा जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.