Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अट्टल घरफोड्या रंडो यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने अटक करुन,उघड केला घरफोडीचा गुन्हा..

29


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अट्टल घरफोड्या रंडो यवतमाळ  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

यवतमाळ (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यात घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्याला शिताफीने अटक करून जिल्ह्यातील एकूण १७ घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण ०५ व वाशिम जिल्हयात ०४ एकूण १३ घरफोडी चोरी अशा प्रकारे एकूण ३० घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड करुन त्यांचेकडून गुन्हयात वापरलेली स्कूटी, घरफोडी मुद्देमाल सोन्या,चांदीचे दागिणे, रोख रक्कम, व घरफोडी करण्यासाठी आवश्यक आसलेली हत्यारे व मोबाईल आदी ज्यांची किं.११ लाख २६ हजार हे जप्त केले आहेत.

यवतमाळ जिल्हयात चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी असे गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध धंदे यांचा शोधसह कार्यवाही करणे या संबंधाने तसेच नेर पोलिस स्टेशन हद्दीत मागील दोन महिन्यात एका पाठोपाठ एक दिवसा घरफोडीचे चार गुन्हे घडल्याने घरफोडी चोरी करणा-या आरोपीतांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पवन बन्सोड (भा.पो.से.) पोलिस अधीक्षक यवतमाळ यांचे प्राप्त आदेशान्वये वरिष्ठांचे मार्गदर्शनात विविध पथके तयार करून सदर आरोपींचा शोध घेत असतांना पोलिस रेकॉर्डवरील घरफोडी चोरी करणारा अट्टल चोरटा रंडो ऊर्फ फिरोज खान, रा.तुकारामबापू वॉर्ड मुखरे चौक पुसद यांनी केला असल्याचे गोपनीय माहीतीव्दारे व तांत्रीक पुराव्याच्या आधरावर गुन्हा केल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याचा शोध घेत असतांना (दि.१५एप्रिल २०२३) रोजी दुपारी १३.०० वा स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलिस अधिकारी व अंमलदार हे तसेच सायबर शाखा यवतमाळ येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना अट्टल घरफोडी चोरटा रंडो ऊर्फ फिरोज खान हा पुसद येथे येत असल्याबाबत गोपनीय माहीती मिळाल्याने नमूद पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून अतिशय कौशल्यपुर्ण रितीने पोलिस कौशल्याचा वापर करत शिताफीने माहूर फाटा पुसद येथे पकडून त्याचेकडे घरफोडी चोरीचे गुन्हयाबाबत कौशल्यपूर्ण विचापूस तंत्राच्या आधारे तपास केला असता यवतमाळ जिल्ह्यातील एकूण १७ घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण ०५ व वाशिम जिल्हयात ०४ एकूण १३ घरफोडी चोरी अशा प्रकारे एकूण ३० घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कौशल्यपूर्ण उघड करुन त्यांचेकडून गुन्हयात वापरलेल्या सुझुकी कंपनीचे स्कुटीची पाहणी करता त्याचेकडे घरफोडी मुद्देमाल सोन्या,चांदीचे दागिणे, रोख रक्कम, व घरफोडी करण्यासाठी आवश्यक आसलेली हत्यारे व मोबाईल मिळून आले आहेत.

तसेच वाशिम जिल्ह्यातील इतर ०४ व अमरावती जिल्ह्यातील इतर ०५ असे एकूण ३० घरफोडी चोरीचे गुन्हे करणारा अट्टल घरफोडी चोरटा रंडो उर्फ फिरोजखान साहेबखान (वय ३४ वर्षे), रा.तुकारामबापू वॉर्ड मुखरे चौक पुसद याचे कडून १३४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व ४२१.७ ग्रॅम चांदीचे दागिणे, गुन्हयातील वापरलेले मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम ६३,५००/- असा एकूण ११,२६,८००/- रु. चा मुद्देमाल हा जप्त करुन त्यास पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन नेर यांच्या ताब्यात दिले आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॅा पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक  पियुष जगताप, पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलिस निरीक्षक परदेशी, सपोनि अमोल पुरी सायबर शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि. गजानन गजभारे, पोउपनि.शरद लोहकरे, चापोउपनि. रेवण जागृत, चापोउपनि. रविंद्र श्रीरामे, पोहवा.सोहेल मिर्झा, पोहवा. तेजाब रणखांब, पोहवा. सुभाष जाधव, पोहवा. कुणाल मुंडोकार, पोहवा.रमेश राठोड, पोशि.मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, अजय निंबोळकर,अभिनव बोंद्रे, मपोशि. पुजा भारस्कर सायबर शाखा यवतमाळ, पोलिस मित्र सुंशात गिरनाळे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.