Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसरा, २०२२मध्ये ६६ हजार लोक बनले अमेरिकन, पहिला नंबर कोणाचा?

10

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणाऱ्यांत भारतीयांचा क्रमांक दुसरा असल्याचे समोर आहे. सन २०२२मध्ये एकूण ६५ हजार ९६० भारतीयांना अधिकृतरीत्या अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले असल्याचे काँग्रेस सभागृहाच्या ताज्या अहवालात समोर आले आहे.

अमेरिकेच्या जनगणना विभागाने केलेल्या अमेरिकी समुदाय सर्वेक्षण माहितीनुसार, सन २०२२मध्ये एकूण चार कोटी ६० लाख परदेशी नागरिक अमेरिकेत वास्तव्याला. ही संख्या अमेरिकेच्या ३३ कोटी ३० लाख लोकसंख्येच्या १४ टक्के. यापैकी तब्बल ५३ टक्के म्हणजेच दोन कोटी ४५ लाख नागरिकांची नैसर्गिक नागरिक म्हणून नोंद.

१५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या ‘अमेरिका नॅचरलायझेशन पॉलिसी’ अहवालात, स्वतंत्र ‘काँग्रेस संशोधन सेवे’ने (काँग्रेसेशनल रिसर्च सर्व्हिस) दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२२मध्ये एकूण नऊ लाख ६९ हजार ३८० नागरिकांना मिळाले अमेरिकेचे नागरिकत्व.

अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणाऱ्यांत सर्वाधिक संख्या मेक्सिकोच्या नागरिकांची. मेक्सिकोच्या सर्वाधिक एक लाख २८ हजार ८७८ नागरिकांनी मिळवले अमेरिकेचे नागरिकत्व. त्यापाठोपाठ भारत (६५, ९६०), फिलिपाइन्स (५३,४१३), क्युबा (४६,९१३), डॉमिनिकन रिपब्लिक (३४,५२५), व्हिएतनाम (३३,२४६) आणि चीनचा (२७,०३८) क्रमांक.
कोट्यवधींची शेतजमीन, बीएमडब्ल्यू; ५ वर्षात शशिकांत शिंदेंच्या संपत्तीत दहा कोटींची वाढ
सन २०२३च्या सीआरएस अहवालानुसार
– अन्य देशांत जन्मलेल्या अमेरिकी नागरिकांपैकी सुमारे २८ लाख ३१ हजार ३३० नागरिक भारतातील. – अमेरिकेत सर्वाधिक एक कोटी सहा लाख ३८ हजार ४२९ नागरिक मेक्सिकोत जन्मलेले. त्यापाठोपाठ चीनचा (दोन कोटी २२ लाख पाच हजार ४४७) क्रमांक.
– भारतात जन्मलेल्या व अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांपैकी तब्बल ४२ टक्के नागरिक सध्या अमेरिकेचे नागरिक होण्यास अपात्र.
– सन २०२३पर्यंत भारतात जन्मलेले अन् ग्रीन कार्ड किंवा लीगल परमनंट रेसिडन्सी (एलपीआर) मिळवलेले दोन लाख ९० हजार नागरिक अधिकृत नागरिकत्वासाठी पात्र.

प्रलंबित नागरिकत्व अर्जांचा निपटारा

नागरिकत्वाचे अर्ज प्रलंबित राहात असल्याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर नागरिकत्वाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ‘यूएससीआयएस’ने प्रलंबित अर्जांची संख्या अर्ध्याहून कमी केली. आर्थिक वर्ष २०२३च्या अखेरपर्यंत यूएससीआयएसकडे नागरिकत्वाचे सुमारे चार लाख आठ हजार अर्ज प्रलंबित. आर्थिक वर्ष २०२२पर्यंत ही संख्या साडेपाच लाख होती. तर, सन २०२१पर्यंत हीच संख्या आठ लाख ४०हजार व २०२०पर्यंत नऊ लाख ४३ हजार होती. आर्थिक वर्ष २०२३मध्ये ‘एलपीआर’ असणाऱ्या आठ लाख २३ हजार ७०२ नागरिकांचा नागरिकत्वासाठी अर्ज.

मला परभणीकर नोट आणि वोट दोन्ही देत आहेत, मी साडेतीन लाख मतांनी निवडून येणार : महादेव जानकर

नैसर्गिक नागरिकत्व मिळवणाऱ्या हुंडारूस, ब्राझिल मागे

नैसर्गिक नागरिकत्व मिळवणाऱ्यांत हुंडारूस, ग्वाटेमाला, व्हेनेझुएला, मेक्सिको, एल साल्वाडोर आणि ब्राझिलमधील स्थलांतरितांचे प्रमाण सर्वांत कमी. तर, असे नागरिकत्व मिळवणाऱ्यांत व्हिएतनाम, फिलीपिन्स, रशिया, जमैका आणि पाकिस्तानमधील स्थलांतरितांचे प्रमाण सर्वाधिक.

निकष पूर्ण करणे महत्त्वाचे

नैसर्गिक नागरिकत्वासाठी पात्र होण्याकरिता अर्जदाराने ‘इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट’ (आयएनए) मध्ये नमूद केलेले काही निकष पूर्ण करणे आवश्यक. त्यात सर्वसाधारणपणे ती व्यक्ती किमान पाच वर्षांसाठी कायदेशीर स्थायी निवासी (एलपीआर) असणे आवश्यक.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.