Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

IPL जुगारावर अहेरी पोलिसांचा छापा,१० जुगारी ताब्यात..

7

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर अहेरी पोलिसांची मोठी कार्यवाही…

अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी दिलेले आहे

त्याअनुषंगाने दि.(27) रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणारे इसम बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने अपर पोलिस अधीक्षक अहेरी  एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे,पोलिस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी व पोलीस स्टॉफ सह विशेष मोहिम राबवुन मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले.

घटनास्थळावरुन  निखील दुर्गे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख 9,420/- रु असा मुद्देमाल मिळुन आला.  नमुद दोन्ही आरोपींना विश्वासात घेवुन विचारपुस करुन अधिक चौकशीत असे निष्पन्न झाले की,
इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करतात. गुन्हयातील आरोपी 1) निखील मल्लया दुर्गे2)आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम गोगीवार, 4) निखील गुंडावार, 5) प्रणित श्रीरामवार, 6)अक्षय गनमुकलवार, 7)फरमान शेख, 8)फरदिन पठाण, 9)इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, 10) संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचे विरुध्द पोलिस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक  नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक(अभियान) यतिश देशमुख,अपर पोलिस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी  अजय कोकाटे यांच्या नेतृत्वात, पोलिस निरीक्षक पोस्टे अहेरी. दशरथ वाघमोडे, पोउपनि जनार्धन काळे, पोउपनि गवळी,पोहवा काबंळे, पोहवा संजय बोलीवार,पोहवा पठाण, पोहवा मडावी, पोहवा/शेन्डे, पोशि केंद्रे,देवेद्र दुर्गे,सुरज करपे,दहिफळे व चानापोशि भंडे यांनी पार पाडली. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दुर राहुन जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहिती पोलिस विभागाला देण्याचे आवाहन  पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

The post IPL जुगारावर अहेरी पोलिसांचा छापा,१० जुगारी ताब्यात.. appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.