Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिवसा घरफोड्या करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

11


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

दिवसा घरफोड्या करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती (प्रतिनिधी) – दिवसा घरफोड्या करणाऱ्या भुरट्या घरफोड्याला अमरावती गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडून २० हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. सदर आरोपीकडून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील अभिलेखावर असलेले अप क्रमांक ३३०/२४ कलम ४५४,३८० भादवी व अप क्रमांक ८८/२३ कलम ४५४,३८० भादवी असे दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०१ मे) रोजी फिर्यादी नामे सतीष चुन्नूलाल श्रीवास्तव, (वय ४४ वर्ष) रा.मेलापुरा अंजनगाव सुर्जी यांनी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे फिर्याद दिली की (दि.३०एप्रिल) रोजी फिर्यादी हजर नसतांना अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे छतावरून घरात प्रवेश करून घरात असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे पदक, सोण्याचे मनी, सोण्याची फॅन्सी पोत, सोण्याची अंगठी, सोन्याचा वेडा, कानातील टॉप व नगदी असा एकूण ९८,४९१/- रू. चा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत अज्ञात आरोपी विरूध्द पोलीस स्टेशनला अप क्रमांक ३३०/ २४ कलम ४५४,३८० भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी सदर गुन्हा उघडकीस यावा या करीता पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी तसेच स्थानीक गुन्हे शाखा यांना सुचना निर्गमीत केल्या होत्या (दि.०७एप्रिल) रोजी स्थानीक गुन्हे शाखा चे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरची चोरी हि ग्राम चोहट्टा बाजार ता.आकोट पोथी राहनारा नारायण उर्फ रवी डाबेराव याने केली आहे, अशा माहितीवरून पथकाने ग्राम चोहट्टा बाजार येथे जाऊन नारायण उर्फ रवी डाबेराव याचा शोध घेऊन त्याला देशी दारू दुकानासमोरून ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नारायण उर्फ रवी रामदास डाबेराव (वय ३१ वर्ष) रा.वार्ड नं.३ स्टेट बँक मागे मोहटा बाजार असे सांगितले. त्याला गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला पून्हा विश्वासात घेऊन पून्हा विचारपूस केली असता त्याने सांगितले की, (दि.३०एप्रिल) रोजी तो चोरी करायला अंजनगाव सुर्जी येथे आला होता व चोरी करायला बंद घर शोधत असतांना त्याला एका कॉलनीत बंद घर दिसल्याने घराचे शेजारी असलेल्या झाडाचे साहाय्याने छतावरून बंद घरात प्रवेश करून हॉल मधील लोखंडी आलमारीतील सोन्याचा मुद्देमाल व नगदी पैसे बोरून नेल्याबाबत गुन्हयाची कबूली दिली तसेच त्याने अंदाजे एका वर्षा अगोदर सुध्दा अंजनगाव सुर्जी येथे दिवसाने बंद घरात चोरी केल्याचे सांगीतले त्याचे ताब्यातून नगदी ९३६/- रू. तसेच दोन गोलाकार पिवळया धातूचा रवा एकूण ४८६ ईम कि.अं.२०,०००/- रू. असा एकूण २०,९३६/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन अंजनगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीकडून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील अभिलेखावर असलेले अप क्रमांक ३३०/२४ कलम ४५४,३८० भादवी व अप क्रमांक ८८/२३ कलम ४५४,३८० भादवी असे दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पोउपनि संजय शिंदे, पोलिस अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डागोरे यानी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.