Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खुनाचा प्रयत्न करुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घातल्या बेड्या..

11


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

खूनाचा प्रयत्न करुन फरार असलेल्या आरोपीस पिस्टलसह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेले परंतु फरार असलेल्या आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस
निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात फरारी आरोपींना अटक करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.

त्यानुसार दि.(10) रोजी गुप्त बातमीदाराकडून लालवाडी पुलाजवळ एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि साईनाथ पुयड व पोलिस अंमलदार असे लालवाडी पुलाजवळ आला असता सदर ठिकाणी सापळा लावून अतिष पिता विष्णु सुर्यवंशी, वय 23 वर्ष,रा. लालवाडी रेल्वेब्रिजचे बाजूस, शिवाजीनगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या बाळगलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व एक मोबाईल असा एकूण 30,000/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरचा आरोपी हा 1) पो. स्टे. भाग्यनगर गु.र.नं. 272 /2023 कलम 307, 326, 143, 147, 149 भा.दं.वि., 2) पो. स्टे. शिवाजीनगर गु.र.नं. 147/2024 कलम 324,
504, 34 भा.दं.वि. हे गुन्हे करुन फरार होता त्यास सदर गुन्हयात अटक करुन संबंधीत पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार,अपर पोलिस अधीक्षक,भोकर डॅा खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्था. गु.शा, नांदेड, पोउपनि साईनाथ पुयड,पोलिस अंमलदार माधव केंद्रे, गुंडेराव करले, दिपक पवार, किशन मुळे, देवा चव्हाण, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, मोतीराम पवार, ज्वालासिंघ बावरी, मपोशि मेहजबीन शेख यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.