Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तलवारीसह एकास युनीट २ ने घेतले ताब्यात…

10


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांची अवैध्य शस्त्र बाळगणा-या आरोपीवर धडक कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन एक घातक तलवार घेतली ताब्यात…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध्य धंदयावर व शस्त्र बाळगणा-यांवर  कारवाई करणे बाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट २ यांनी दिनांक (१६) रोजी मोहीम राबवुन अवैध्यरित्या शस्त्र बाळगणा-या आरोपीवर खालील प्रमाणे कार्यवाही केली. पोलिस निरीक्षक, गुन्हेशाखा अमरावती शहर यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हद्दीत गुन्हेशाखा युनिट २ चे अधिकारी व अंमलदार हे अवैध्द धंदयांवर रेड व गुन्हेगार चेक करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना. गुप्त बातमीदारा कडुन खात्रीलायक माहीती मिळाल्या वरून, मसानगंज येथील सार्वजनिक विहीरी जवळ गेले असता एक इसम हा त्याचे हातात लोखंडी तलवार घेवुन उभा असलेला दिसला.

सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे हातातील लोखंडी तलवार सुरक्षितरित्या काढुन घेवुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रोहीत उर्फ गोलु विजयसिंग ठाकुर वय ३२ वर्ष रा. मसानगंज, सोनल गुप्ताचे घरा समोर, अमरावती असे सांगितले. नमुद आरोपीचे ताब्यातुन एक नग लोखंडी तलवार ज्याची एकूण लांबी ३९.५ इंच असून पाते एका बाजुला धारदार टोक निमोळते ज्याची लांबी ३२.०५ इंच रुंदी १.५ इंच, मुठ लोखंडी हॅन्ड ग्रीप असलेली मुठ ज्याची लांबी ७ इंच, कि. अं. ३,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले. नमुद आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे कलम ४ / २५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई  पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हेशाखा  कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त परीमंडळ- १. सागर पाटील,पोलिस उपायुक्त परीमंडळ – २ गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे  शिवाजी बचाटे यांचे
मार्गदर्शनाखाली पोनि. राहुल आठवाले, गुन्हे शाखा युनीट २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली युनिट २ चे सपोनि महेश
इंगोले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, पोलीस शिपाई जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, संग्राम भोजने, नईम बेग, मंगेश शिंदे, चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.