Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे शहर : एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; गंजपेठेततील घटनेने खळबळ

69

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

पुणे : प्रेयसीची भेट न झाल्यामुळे चिडलेल्या तरुणाने प्रेयसीच्या मावस बहिणीच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज (दि.19 मे) रोजी गंज पेठ,पुणे येथे पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.

या गोळीबारात प्रेयसीची मावस बहिणीस किरकोळ दुखापत झाली आहे.

याप्रकरणी एका तरुणीने(वय-18) खडक पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे. त्यावरून ऋषी सुनील बागूल(वय-26) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार तरुणीची मावस बहिण घटस्फोटीत असून तिचे आरोपी ऋषी बागूल याच्याशी प्रेमसंबंध होते.परंतु, काही दिवसांपूर्वी ऋषीचा प्रेयसीशी वाद झाला होता. प्रेयसीने ऋषीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता.तसेच त्याच्याशी संबंध तोडला होता.त्यामुळे ऋषी प्रेयसीला भेटायला मित्रासमवेत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तिच्या गंज पेठेतील घरी जाऊन तिच्या घराचा दरवाजा जोरात वाजवत प्रेयसीला बाहेर बोलावले, पण ती घरी नव्हती. तक्रारदार तरुणी आणि तिची दुसरी मावस बहिण घरी होती.

त्या दोघींनी प्रेयसी घरी नसल्याचे आरोपीला सांगितले.आरोपीने तरुणीला प्रेयसीच्या मोबाईलवर संपर्क करण्यास सांगितले. पण,तिच्याशी संपर्क न झाल्यामुळे आरोपी ऋषीने तक्रारदार तरुणीच्या दिशेने गोळीबार केला.त्यावेळी ठिणगी उडाल्याने तरुणीच्या मावस बहिणीच्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाली आहे. ‘आरोपीने कोणालाच सोडणार नाही’ अशी धमकी देत तक्रारदार आणि तिच्या मावस बहिणीच्या घराला बाहेरून कडी लावली व तसाच तो निघून गेला अशी तक्रार फिर्यादी तरुणीने खडक पोलिसांना दिली.

खडक पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पुढील तपास ते करत आहेत.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1,”addons”:2},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
Leave A Reply

Your email address will not be published.