Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.२५:- बाणेर परिसरातील तीन रूफटॉप पब रेस्टॉरंटवर (हॉटेल) पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करून, तेथील पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले. आज शनिवारी दुपारी बांधकाम विभाग झोन तीनच्यावतीने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
बाणेर येथील हॉटेल इमेज रेस्टोबार, आइस अँड फायर ( बाणेर हायवे लगत) आणि हॉटेल हाईव्ह (रांका ज्वेलर्सच्यावर बाणेर) येथे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ११ हजार ९२५ चौरस फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले. सदरच्या कारवाईत बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, बांधकाम विभागा झोन तीनचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्यासह उप अभियंता प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर व दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने ही कारवाई केली गेली.
९ रूफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल –
बाणेर मधील एकूण ९ रुफ टॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याव्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.
.सदरची कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता – श्रीधर येवलेकर
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता – जयवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली
उप अभियंता – प्रकाश पवार,
कनिष्ठ अभियंता – अजित सणस, संदीप चाबुकस्वार, केतन जाधव व
स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.