Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विश्रांतवाडी/ पुणे :- अनुप फंड | पोलीस अंमलदार यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या , विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं १६७/२०२१ भा.दं.वि. कलम ३०७,३५३,३३३,४२७ प्रमाणे दि.२८/०९/२०२१ रोजी गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्यातील पाहिजे संशयीत आरोपी रिक्षा ड्रायव्हर हा पळून गेला होता. सदर संशयित आरोपीचा शोध घेणेकामी मा. पोलीस निरीक्षक साहेब, (गुन्हे) विश्रांतवाडी पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून त्याचा खडकी, बोपडी भागात शोध घेतला असता पोलीस अमलदार संदीप देवकाते, शेखर खराडे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदरचा संशयित आरोपी रिक्षाचालक हा चाकण आठवडा बाजारात येथे दि. ३०/०९/२०२१ रात्री २०:०० वाजेच्या सुमारास येणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक साहेब (गुन्हे) यांच्या आदेशाप्रमाणे रोजी पोलीस उपनिरीक्षक एल्. आर. सातपुते, पोलीस हवलदार चव्हाण , पोलीस शिपाई देवकाते, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई खराडे, असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन बातमीच्या अनुषंगाने चाकण आठवडा बाजार येथे सापळा लावून थांबले तेव्हा दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मधील वर्णनाचा संशयित इसम रिक्षाचालक हा २०:१५ वाजेच्या सुमारास चाकण आठवडा बाजारात रिक्षामधून उतरताना दिसला त्याचा संशय आल्याने व तोच संशयित आरोपी असल्याची खात्री झाल्याने स्टाफचा मदतीने त्यास जागेवर पकडून ताब्यात घेऊन त्याचे नाव, पत्ता, विचारले असता त्याने त्याचे नाव आरमोगम कंदस्वामी पिल्ले राहणार सर्वे नंबर २४, सावंत नगरी, पत्राचाळ,बोपोडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केला तसेच त्याचे ताब्यातील रिक्षा क्रमांक एम एच १४ एच एम ८०८० त्याच्याकडे अधिक तपास केला असता. त्याने सदरची रिक्षा बोपोडी, खडकी पुणे येथून चोरल्याचे सांगितले खडकी पोलीस स्टेशन येथे खात्री करता सदर रिक्षा बाबत खडकी पोलीस स्टेशन येथे गुरनं २८६/२०२१ भा. दं. वि. ३८९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. आरोपीस दाखल दिनांक ३०/०९/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई मा.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, पुणे शहर मा. रमेश गलांडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे मा. अजय चांदखेडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी तसेच विजयकुमार शिंदे ,पोलिस निरीक्षक गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी लहू सातपुते, पोलीस हवालदार विजय सावंत, दीपक चव्हाण, पोलीस नाईक यशवंत किर्वे, पोलीस शिपाई प्रफुल्ल मोरे , शेखर खराडे, संदीप देवकाते , शिवाजी गोपनर , योगेश चांगण , राज राठोड (P-4 महाराष्ट्र राज्य ) विशेष पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सदरील कामगिरी केली.