Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
गुन्हे शाखा युनिट २ ने उघड केले ३ जबरी चोरीचे गुन्हे,४ आरोपींना ताब्यात घेऊन २,२९,२०० /- रू चा मुददेमाल केला जप्त…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि(१८) रोजी फिर्यादी मंगेश किशोर वानखडे रा. कठोरा बु. अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि(१८) रोजी रात्री दरम्यान अंदाजे १२.३० वा. कामावरून मोटारसायकलने घरी जात असताना राजपुत धाबा ते जकात नाका रोडवरील देशमुख फार्म जवळ एका मोपेड गाडीवर २० ते २२ वर्षाचे ३ इसम आले. त्यांनी फिर्यादी यास थांबवून आमचे गाडीचे पेट्रोल संपले असे सांगून फिर्यादीजवळील ओप्पो कंपनीचा मोबाइल अंदाजे किंमत ८,०००/- रू नगदी ३००० /- रू व गाडीची चाबी जिवे मारण्याचा धाक दाखवून जबरीने हिसकावून घेतले.
तसेच त्या रात्री दरम्यान नमुद वर्णनाच्या आरोपींनी व इतर दोन साथीदारांनी रजनी मंगलकार्यालय येथून एका पती पत्नींचा रेडमी कंपनीचा मोबईल व ३ ग्राम सोन्याची पोत जबरीने हिसकावून घेतली. त्याचबरोबर शहरातील जिल्हा स्टेडीयम येथून एका इसमाकडून, गाडगेनगर रोड वरील ठाकरे मेडीकल समोरून एका इसमाजवळून जबरीने मोबाईल हिसकावून घेतले. नमुद आरोपीनी एकाच रात्रीमध्ये चार ठिकाणी जबरी चोरी करून एकूण ४ मोबाईल, ३ ग्रॅम सोने, ३०००/- रु नगदी असा एकूण ५३,०००/- रू चा मुददेमाल जबरीने चोरून नेला अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. गाडगेनगर येथे अप.क्र. ३८७/२०२४ कलम ३९२, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
पोलिस आयुक्त, नविनचंद्र रेडडी यांनी आदेशीत केल्यावरून पोलिस निरीक्षक, राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट २ यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दि(२५) रोजी गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून गुन्हयातील ४ आरोपी १) शेख इमरान उर्फ बफर शेख सादीक वय २२ वर्ष रा. गुंलीस्ता नगर
अमरावती, २) रिजवान बेग वल्द रहमत बेग वय १९ वर्ष रा. हबीब नगर गल्ली नबंर २ अमरावती, ३) साकिब खान वल्द इबादुल्ला
खान वय २० वर्ष रा. उस्मान नगर अमरावती, ४) शेख जुनेद शेख राजीक वय १९ वर्ष रा.गुलीस्ता नगर नबंर २ अमरावती यांना
ताब्यात घेवून त्यांची कसोशीने चौकशी करून त्यांना विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा
केल्याचे कबूल केले. त्यांचे ताब्यातून गुन्हयातील व इतर गुन्हयातील असे एकूण ६ मोबाईल, गुन्हयात वापरलेले ३ चाकू, व गुन्हा करते वेळी वापरलेले २ वाहन असा एकूण २,२९,२०० /- रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला.
त्यांचा एक साथीदार फरार असुन त्याचा शोध सुरू असून त्याचेकडून जबरी चोरीचे बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदर गुन्हयातील आरोपींनी लोकसभा निवडणुक काळात रेसर बाईकचा वापर करून, जवळ शस्त्र बाळगून एकाच रात्रीमध्ये वेगवेगळया ५ ते ६ ठिकाणी लोकांना धाक दाखवून, धुमाकूळ घालून जबरी चोरी सारखे गुन्हे केल्याने पोलिसासमोर सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आव्हान असतांना गुप्त माहितीचे तांत्रीक विश्लेषण करून गुन्हे शाखा युनिट. २ च्या पथकाने अहोरात्र प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकिस आणला.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि सत्यवान भुयारकर, सपोनि अनिकेत कासार (सायबर), पोउपनि संजय वानखडे, सफौ राजेंद्र काळे,पोहवा जावेद अहमद, गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, नापोका संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चंद्रशेखर रामटेके, पोशि चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, पोहवा संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.