Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रेयसीच्या पहिला प्रियकर भेटण्या

9

पिंपरी चिंचवड ,दि.२८ झुंजार ऑनलाइन :- एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या अंगावर कार घालून गंभीर जखमी केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. तर सुशील भास्कर काळे याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.27) मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील काळे आणि जखमी निलेश शिंदे या दोघांचं एका तरुणीवर प्रेम आहे. मात्र, प्रेयसी ही आरोपी काळे याच्यावर प्रेम करते तर निलेश हा त्या तरुणीचा आधीचा प्रियकर आहे. निलेश तिला त्रास देत असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. मध्यरात्री निलेश हा गर्लफ्रेंडला दुचाकी घेऊन भेटण्यासाठी आला होता. याची माहिती त्या तरुणीने सुशील याला दिली. टेल्को रोडवर निलेश आणि सुशील याची प्रेयसी बोलत थांबले होते, तेव्हा सुशील याने भरधाव वेगाने गाडी निलेशच्या अंगावर घातली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले.

पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.